केंद्र सरकार देणार दिवाळी गिफ्ट; LPG सिलेंडर स्वस्त होणार?

येत्या दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारकडून मोठे गिफ्ट मिळू शकते. सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलपीजी सिलेंडरचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त सबसिडी लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त सबसिडी लागू करण्याच्या तयारीत

गेल्या काही वर्षांमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षांत गॅस सिलेंडरचे दर २४४ रुपयांनी वाढले. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०५३ रुपये आणि सबसिडी ८५३ रुपये आहे. तर घरगुती गॅसची किंमत १०५२ रुपये आहे.

( हेही वाचा : राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा, तर गोव्यात ‘भाजप जोडो’ जत्रा! चित्रा वाघ यांचा कॉंग्रेसवर निशाणा)

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम देशातील एलपीजी गॅसच्या किंमतींवर होत आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता. यानंतर आता सिलेंडरच्या किंमती कमी करण्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्यावर सरकारकडून विचार सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार २५ ते ३० हजार कोटी रुपये खर्च करू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here