तुम्हालाही मोफत LPG गॅस कनेक्शन मिळवायचे आहे? अशी करा नोंदणी

154

देशातील नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी मोदी सरकार नेहमी विविध योजना आणत असते. या योजना आखून सरकार दुर्बल घटकातील लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असते. अशातच प्रत्येक घरात सिलिंडर पोहोचले पाहिजे या हेतूने मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असताना काही लोकांना गॅस सिलिंडर खरेदी करणे अशक्य झाले आहे. पण या सरकारी योजनेंतर्गत तुम्हालाही गॅस सिलिंडर मोफत मिळू शकतो.

कोणती आहे सरकारची योजना

गॅस सिलिंडर मोफत मिळणाऱ्या या योजनेचे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असे नाव आहे. या योजनेंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शनवर मिळणाऱ्या सबसिडीत मोठा बदल होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शन घेण्याच्या विचारात असाल तर मोफत एलपीजी गॅस कनेक्शन कसे मिळवायचे ते सविस्तर वाचा

(हेही वाचा – … तर LPG गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही! काय आहे कारण?)

अशी करा उज्ज्वला योजनेत नोंदणी

  1. बीपीएल कुटुंबातील एक महिला उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी पात्र असते
  2. pmujjwalayojana.com या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही भेट देऊन या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकतात
  3. यावर नोंदणीकरून एक अर्ज तुम्हाला भरावा लागेल. यानंतर तो अर्ज जवळच्या एलपीजी वितरकाला द्यावा लागणार आहे.
  4. या अर्जात तुम्हाला अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव, पत्ता, बँक खाते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक देखील देणे बंधनकारक असणार आहे
  5. यानंतर तेल विपणन कंपन्या पात्र लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन देई शकतात.
  6. ग्राहकाने ईएमआय निवडल्यास, रक्कम सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये समायोजित केली जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.