लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर विशेष गाडी (LTT-Nagpur Special Trains) लोकमान्य टर्मिनस येथून शनिवार, ७ ऑक्टोबर आणि रविवार, ८ ऑक्टोबरला रात्री १० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर विशेष शुल्कावर (special charges) दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा येथे थांबेल. या गाडीला १८ डबे असतील. यामध्ये एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, सात शयनयान आणि सात सामान्य द्वितीय श्रेणींच्या सामानासह गार्ड ब्रेक व्हॅनचा (Guard brake van) समावेश आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : शहरी नक्षलवादास प्रतिबंध घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा)
Join Our WhatsApp Community