लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग लागल्याची घटना बुधवारी ( १३ डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली. ही आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. (LTT Station Fire)
लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लेव्हल १ ची असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. (LTT Station Fire)
(हेही वाचा : Lok Sabha Security Breach : लोकसभेत उपस्थित खासदारांनी सांगितला धक्कादायक प्रकार)
तसेच अधिक नुकसान होऊ नये यासाठी या स्थानकावरील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. तसेच या स्थानकातून सुटणाऱ्या गाड्याही काही काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. तर या लागलेल्या आगीत वेटिग रूम आणि तिकीट खिडकीचे नुकसान झाले आहे. ही आग लागल्यानंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना स्थानका बाहेर काढले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community