Lucknow Building Collapse : लखनौमध्ये इमारत कोसळून 8 जण ठार, 28 जखमी

113
Lucknow Building Collapse : लखनौमध्ये इमारत कोसळून 8 जण ठार, 28 जखमी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप टॉवरचा एक भाग शनिवारी सायंकाळी कोसळला. या घटनेत आतापर्यंतच्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण जखमी आहेत. या इमारतीत औषध आणि तेल कंपन्यांची चार गोदामं होती, अशी माहिती आहे. तिथे 30 कर्मचारी काम करायचे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी दोन लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. (Lucknow Building Collapse)

(हेही वाचा – छत्रपती शिवरायांविषयी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर DCM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला तीव्र संताप)

हरमिलाप टॉवर येथील तीन मजली इमारत कोसळली. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी तिथं ट्रकमधून माल उतरवला जात होता. या टॉवरमध्ये औषधं, गिफ्ट, पॅकिंग, मोबिल ऑईल याची गोदाम होती. तिथून ते साहित्य इतर ठिकाणी पाठवलं जायचं. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला ट्रक चालक राजेश पालने सांगितले की, सायंकाळी 4.55 वाजता तो या इमारतीमध्ये पोहोचला होता. त्यानं ट्रकमधून साहित्य उतरवण्यासाठी तो इमारतीत लावला होता. दिल्लीहून आणलेली औषधं उतरवून घेण्याचं काम सुरु होतं, ते दुसऱ्या मजल्यावर नेलं जात होतं. हे काम जवळपास 15 ते 20 लोक करत होते, तेवढ्यात इमारत कोसळली. (Lucknow Building Collapse)

(हेही वाचा – आता Bangladesh मध्ये राष्ट्रगीत बदलण्याची मागणी; म्हणे, भारताने १९७१ मध्ये हे गीत आमच्यावर लादले)

कुणालाच काही समजलं नाही, साहित्य उतरवण्याचं काम करणाऱ्या लोकांनी पळत जाऊन जीव वाचवला. काही लोकांना स्थानिकांसह पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले. स्थानिक प्रशासनानं या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरु केलं. यामध्ये स्थानिक पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लखनौ महानगर पालिकेची टीम सहभागी झाली होती. ट्रान्सपोर्ट नगर व्यापार मंडळाचे आणि गोदाम संघटनेचे प्रवक्ते राजनारायण सिंह यांनी पाणी साचलं नसतं ही घटना घडली नसती, असा दावा केला. तर, प्रशासनानं चौकशीनंतर या घटनेमागील कारण स्पष्ट होईल. साधारणपणे ही इमारत 15 वर्षांपेक्षा जुनी नव्हती. (Lucknow Building Collapse)

(हेही वाचा – Fraud : पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची नऊ कोटींची फसवणूक)

पंतप्रधानांकडून मदत जाहीर

उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या वारसाला दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ समाजमाध्यमावर दिलेल्या संदेशात म्हटले की, उत्तर प्रदेशात लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानी दु:खद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. जखमी लवकर बरे होवोत, हीच कामना. प्रत्येक मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल. (Lucknow Building Collapse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.