Lokbandhu Hospital Fire : लोकबंधू रुग्णालयात भीषण आग; सर्व २०० रुग्ण सुखरूप

51

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखनौ (Lucknow) येथील लोकबंधू रुग्णालयामध्ये (Lokbandhu Hospital) सोमवार, १४ एप्रिलच्या रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महिला वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ही आग लागली. (Lokbandhu Hospital Fire)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी, रुग्णालयातील अधिकारी आणि व्यवस्थापनाच्या प्रसंगावधानामुळे २०० रुग्णांना सुखरूप बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. दरम्यान, आता रुग्णालयाला लागलेल्या आगीदरम्यानचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

(हेही वाचा – ‘पश्चिम बंगालमध्ये येऊन जागा दाखवू’; भाजपाच्या Navneet Rana यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल)

घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री बृजेश पाठक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, “तिसऱ्या मजल्यावर धुर दिसून आला. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांनी त्वरित रुग्णांना हलवण्यास सुरुवात केली. सुमारे २०० रुग्णांना हलवण्यात आले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आता चिंतेची काहीही गरज नाही. अग्निशमन दलाचे कर्मचारी इमारतीच्या आत आग विझवण्याचे काम करत आहेत.” सध्या कोणताही रुग्ण जखमी झालेला नाही. सर्वजण सुरक्षित आहेत. दोन-तीन रुग्ण जे येथे गंभीर अवस्थेत दाखल होते, त्यांना केजीएमयूच्या आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.दरम्यान, लोकबंधू रुग्णालयात लागलेल्या आगीची मुख्यमंत्री योगी यांनी दखल घेतली. त्यांनी फोनवर अधिकाऱ्यांकडून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.

लखनौ फायर ब्रिगेडचे सीएफओ मंगेश कुमार यांनी सांगितले की, आम्हाला रात्री ९.४४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आगीच्या दहशतीमुळे अनेक लोक पळत होते. घटनास्थळावर परिस्थिती गंभीर असल्याचे आणि लोक खिडक्यांमधून उड्या मारण्याचा प्रयत्न करत असल्याने जीवितहानीही होऊ शकते, असे चित्र आमच्या पथकाने पाहिले. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे साडेबारा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. जवानांनी केवळ ३० मिनिटांत ही आग शमवली.

आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडच्या पथकाने पोलीस कर्मचारी आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना आगीच्या तावडीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, काही रुग्णांना व्हेंटिलेटरच्या माध्यमातूनही रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. तसेच ऍम्ब्युलन्समधून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. डीसीपी साउथ निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, लोकबंधू रुग्णालयातून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. ही आग नेमकी कशी लागली या कारणांचा शोध घेतला जात आहे. (Lokbandhu Hospital Fire)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.