Unauthorized Hawkers वर कारवाई करणाऱ्या महापालिका पथकावर मुसलमानांचा हल्ला; महापौरांनी थेट बांगलादेशी घुसखोरांच्या घरावर बुलडोजर फिरवला

243
Unauthorized Hawkers वर कारवाई करणाऱ्या महापालिका पथकावर मुसलमानांचा हल्ला; महापौरांनी थेट बांगलादेशी घुसखोरांच्या घरावर बुलडोजर फिरवला
Unauthorized Hawkers वर कारवाई करणाऱ्या महापालिका पथकावर मुसलमानांचा हल्ला; महापौरांनी थेट बांगलादेशी घुसखोरांच्या घरावर बुलडोजर फिरवला

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) दि. २९ डिसेंबर रोजी महापालिकेच्या पथकावर मुस्लिम धर्मांधांनी हल्ला केला. हल्लेखोरांची संख्या सुमारे २०० असल्याचे सांगण्यात येत आहे. अवैध हातगाड्या जप्त करताना हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांमध्ये महिलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात महिला कर्मचाऱ्यांनाही त्रास झाला. यावेळी लुटमारही करण्यात आली. या प्रकरणात शेरू आणि नदीमसह अनेक अनोळखी लोकांची नावे आहेत. हल्लेखोर बांगलादेशी असल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. (Unauthorized Hawkers )

( हेही वाचा : Shivshahi Bus Breakdown : सतत अपघात होणाऱ्या शिवशाही बसची तपासणी सुरु

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊमधील इंदिरा नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी महापालिका कर्मचारी कुलदीप सिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितले की, लखनऊच्या महापौरांच्या आदेशानुसार ते त्यांच्या टीमसह दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता बेकायदेशीर हातगाड्या जप्त करत होते. त्यावेळी एका हातगाडीवरील अनोळखी व्यक्तीने दोन महिलांनी नदीम आणि शेरुला कॉल करून बोलवले. तसेच जमावाला गोळा केले. (Unauthorized Hawkers )

कुलदीप सिंग (Kuldeep Singh) म्हणाले की, नदीम आणि शेरु १५० ते २०० लोकांचा जमाव घेऊन पथक असलेल्या ठिकाणी आले. या जमावाने मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांचे कपडे फाडण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. घटनास्थळी उपस्थित अन्न निरीक्षक विजेता द्विवेदी यांच्या गाडीची ही तोडफोड करण्यात आली. त्यांच्या ड्रायव्हरला कारमधून बाहेर काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली.(Unauthorized Hawkers )

याप्रकरणात कुलदीप सिंग (Kuldeep Singh)व इतर महापालिका कर्मचाऱ्यांचा जीव कसाबसा वाचला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, शेरू आणि नदीम नावासह १५० ते २०० अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेचे कलम १९१ (२), १९१ (३), १२१ (१), १३२, ११५ (२), ३०९ (६), ३२४ (४), ३५१ (२) १३१, ७४ BNS) कलम १०९ सह फौजदारी कायदा अधिनियम १९३२ च्या कलम ७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

लखनऊ पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. लखनऊ महापौर सुषमा खर्कवाल यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. महापौर यांनी हल्लेखोर बांगलादेशी असल्याचा दावा केला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, DM आणि कमिशनर यांना फोन करत महापौरांनी परिसरात PAC लावण्याची मागणी केली आहे. इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशींनी बेकायदेशीर वस्ती बांधली असल्याचे सांगण्यात येत आहे. या वसाहतीत पाणी व वीजपुरवठाही केला जात आहे. हल्ल्यानंतर महापौरांनी वीज जोडणी तोडली. बुलडोझर मागवून ५० झोपडपट्ट्या पाडण्यात आल्या. (Unauthorized Hawkers )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.