लखनौ विद्यापिठाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आयत्या वेळी परवानगी नाकारली. मराठी समाजाचे प्रदेश अध्यक्ष उमेशकुमार पाटील यांनी या वेळी परवानगी नाकारल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Lucknow University)
हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने मराठा समाजातील मोठ्या संख्येने लोक चौकातील लोहिया पार्क येथे जमले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shiv Jayanti) पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अनेक मराठी बांधव या कार्यक्रमासाठी दिल्लीत आले होते. पुण्यातून ढोल-ताशा पथकही आले होते.
(हेही वाचा – Gunaratna Sadavarte: मनोज जरांगेंना नैराश्य आलंय, गुणरत्न सदावर्तेंनी केली कडाडून टीका)
२ महिने आधी अर्ज देऊन आयत्या वेळी नाकारली अनुमती
लखनौ विद्यापिठाच्या या दडपशाहीच्या विरोधात उमेशकुमार पाटील (Umesh Kumar Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. गेल्या ७ वर्षांपासून येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक आणि शिवव्याख्यान होत आहे. त्यामुळे यंदाही येथे मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनुमती मिळावी, यासाठी विद्यापीठ प्रशासनाला ११ डिसेंबर रोजी अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर आम्ही विद्यापीठ प्रशासनाची भेट घेण्यासाठी १०-१२ वेळा प्रयत्न केले. प्रत्येक वेळी व्यस्त असल्याचे कारण सांगून ‘कार्यक्रमाला परवानगी मिळेल’, असे आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.”
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लावण्यास टाळाटाळ
यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून चौक चौराहा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुतळा उभारण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२३ ही मुदत दिली होती; परंतु आजही ही पुतळा उभारण्यात आलेला नाही, असेही उमेशकुमार पाटील यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – Farmers Protest : शंभू सीमेवर शेतकरी आक्रमक; १२०० ट्रॅक्टर्स घेऊन दिल्लीत घुसण्यासाठी पोलिसांवर दबाव)
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ (Pushpendra Kulshrestha) उपस्थित रहाणार होते. त्यांनीही मराठी बांधवांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात बसवण्याचे आवाहन केले आहे.
मंत्र्यांनीही दिल्या होत्या कार्यक्रमाला शुभेच्छा
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्य मंत्री कौशल किशोर यांनीही लखनौ विद्यापिठात प्रस्तावित कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि भारताचे महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी समाजाकडून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे, याचा मला आनंद आहे”, असे कौशल किशोर यांनी म्हटले होते. (Lucknow University)
हेही पहा –