राज्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या लसीकरणाचा संपूर्ण राज्य सरकार करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
( हेही वाचा : जीएसटी चुकवणाऱ्या सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल)
लम्पी त्वचा रोगाचा महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यातील २ कोटी जनावरांपैकी जवळपास ४ हजार जनावरे या रोगाने प्रभावित झालेली आहेत. प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना राबविल्याने हा आजार काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. या रोगाचा इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात प्रभाव कमी आहे. सर्वात जास्त प्रादुर्भाव राजस्थान आणि पंजाब आहे, असे विखे यांनी सांगितले.
या रोगावर उपाययोजना म्हणून राज्यातील १०० टक्के जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत १४ दिवसात एक लाख जणावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लम्पी रोगासाठी लागणाऱ्या औषधांचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे. सर्व लसीकरणही सरकारकडून करण्यात येईल. प्राण्यांच्या आंतरराज्यात प्रवासाला बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र म्हशीवर लम्पी रोगाचा कोणताही प्रादुर्भाव नाही, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
संसर्गजन्य आजार
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः खिलार जनावरांना होतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे सूचित करण्यात आले आहे. अचानक ताप व त्वचेवर गुत्ती येत असल्याने पशुपालन करणारे शेतकरी चितांग्रस्त झाले आहेत.
Join Our WhatsApp Community