हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे मानवी शरीरात घातक अतितीव्र सूक्ष्म धुलिकण जातात. यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता मंदावत जात असल्याचे आढळले आहे. कोरोना प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी सर्दी, खोकल्याच्या आजारातून रुग्ण बरे होण्याचा कालावधी वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातून नोंदवले गेले आहे. याबाबत निश्चित माहिती घेण्यासाठी अभ्यासाची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले.
( हेही वाचा : मुंबईच्या रस्त्यांवर आजही सुमारे ४००हून अधिक खड्डे )
सर्दी, खोकला बराच काळ राहिल्यानंतर विविध तपासण्या केल्या तरीही चाचण्यातून काहीच निष्पन्न होत नाही म्हणून रुग्णाला दिलासा मिळतो. आजारातून बरे होताना किमान महिनाभर घसा खवखवतोय, अशी तक्रार रुग्ण डॉक्टरांकडे करत आहेत. ही एका प्रकारची सूज किंवा एलर्जी रुग्णांमध्ये दिसून येत असल्याची माहिती जनरल फिजिशीयन डॉ. दीपक बैद देतात. कित्येकदा रुग्णांना घशाला जळजळ जाणवते. सर्दी, खोकला झाल्यानंतर रुग्णांमध्ये हा प्रकार आढळून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रुग्णांकडून ही तक्रार येत असल्याचे डॉ. बैद सांगतात.
कित्येकदा ताप आलेल्या रुग्णांच्या विविध आजाराशी निगडित तपासण्या केल्या जातात. या चाचण्या ताप बराच काळ रुग्णांच्या शरीरात राहिल्यानंतर केल्या जातात. या चाचण्यातूनही काहीच निष्पन्न होत नसल्याची माहिती ठाण्याच्या परब रुग्णालयाचे जनरल फिजिशियन डॉ. अभय भावे देतात. या रुग्णांसाठी खास फ्लू पेनल ही तपासणी केली जाते. त्यातूनच शरीरातील विषाणूचा उलगडा होतो. त्याआधारे उपचार पद्धती ठरवता येतात. हा प्रकार वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे होत असून, साध्या आजारातही फुफ्फुस बरे होण्यास वेळ लागत असल्याची माहिती डॉ. भावे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community