तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M K Stalin) यांनी दि. २७ मार्च रोजी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘वक्फ दुरुस्ती विधेयका’ (Waqf Amendment Bill) विरुद्ध विधानसभेत ठराव मांडला, जो विरोधकांच्या तीव्र विरोधादरम्यान मंजूर करण्यात आला. हा ठराव म्हणजे मुस्लीम (Muslims) लांगूलचालनाचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रस्ताव सादर करताना विरोधकांनी सभागृहात जोरदार विरोध केला, परंतु प्रस्ताव मंजूर झाला.
( हेही वाचा : Trimbakeshwar ला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी)
दरम्यान हा प्रस्ताव सादर करताना मुख्यमंत्री स्टॅलिन (M K Stalin) म्हणाले की, “केंद्र सरकारला मुस्लिमांच्या भावनांची पर्वा नाही. केंद्र सरकारने ‘वक्फ कायदा १९९५’साठी ‘वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४’ (Waqf Amendment Bill) मागे घ्यावे, यावर विधानसभेने एकमताने भर दिला. केंद्र सरकार ‘वक्फ’ विधेयकात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे ‘वक्फ बोर्डा’च्या (Waqf Board) अधिकारांना बाधा येईल.”, असेही स्टॅलिनने (M K Stalin) सांगितले.
‘वक्फ दुरुस्ती विधेयका’ (Waqf Amendment Bill) विरुद्ध ‘मांडण्यात आलेल्या ठरावात म्हटले की, भारतातील लोक धार्मिक सौहार्दाने राहत आहेत. संविधानाने (Constitution) प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचे रक्षण करणे, हे निवडून आलेल्या सरकारांचे कर्तव्य आहे, असेही सांगण्यात आले. (Waqf Amendment Bill)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community