स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५९ व्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘माझी जन्मठेप’ (Mazi Janmathep) या वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) पुस्तकाच्या अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्याविष्कार सादर करण्यात येणार आहे.
दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) शनिवार, २२ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सायंकाळी ६ वाजता हे अभिवाचन होणार आहे. या अभिवाचनासाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.
(हेही वाचा – फेस रेकग्निशनची कमाल! MahaKumbh मेळ्यात खतरनाक गुंड अडकले कॅमेऱ्याच्या जाळ्यात)
सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त (Veer Savarkar Atmarpan Din) सादर होत असलेल्या या अभिवाचन कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती अनंत वसंत पणशीकर व नाट्यसंपदा कला मंच यांची असून दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांचे आहे. संकलन अलका गोडबोले, शब्दोच्चारासंबंधातील मार्गदर्शन सुहास सावरकर, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, संगीत मयुरेश माडगावकर यांचे, तर प्रकाश योजना शाम चव्हाण यांची आहे. या अभिवाचनामध्ये जान्हवी दरेकर, मुग्धा गाडगीळ- बोपर्डीकर, गौरव निमकर, समर्थ कुलकर्णी, शंतनू अंबाडेकर, नवसाजी कुडव हे कलाकार सहभागी होणार आहेत. या रंगमंचीय आविष्कारासाठी मंजिरी मराठे यांचे विशेष साहाय्य लाभले.
अनुभवा अंदमानातील मृत्यूचा पराभव आणि सावकरांचा जय !
वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची, म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली. तेथील त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती; पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय. ‘माझी जन्मठेप’ हे वीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या-पाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community