अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचा ‘बजेट डे लूक’ (Budget Day Look) प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळीही खास आहे. त्यांनी सुंदर बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट रंगाची साडी निवडली आहे. साडीवर मधुबनी कला (Madhubani art ) दिसत आहे. मधुबनी कला ही बिहारमधील प्रसिद्ध कला आहे. यामुळे या बजेटमधुन बिहार राज्याला काय मिळणार याकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. बजेट सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारामन यांची साडी (Nirmala Sitharaman’s saree) चर्चेचा विषय ठरत आहे. (Nirmala Sitharaman)
ऑफ-व्हाइट रंगाची साडी का निवडली ?
दुलारी देवी 2021 चा पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच क्रियाकलापासाठी अर्थमंत्र्यांनी मधुबनीला भेट दिली. तेव्हा त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली आणि बिहारमधील मधुबनी कलेबद्दल सौहार्दपूर्ण विचारांची देवाणघेवाण केली. दुलारी देवी यांनी ही साडी सादर केली होती आणि अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पाच्या दिवशी ती घालण्यास सांगितले होते. त्यामुळे 2025 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी, अर्थमंत्र्यांनी सोन्याचे काम असलेली ही साडी निवडली. (Nirmala Sitharaman)
पांढरा रंग शुद्धता, स्पष्टता आणि आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक
यावर्षी 2025 च्या बजेटसाठी सीतारमण यांनी आपला लूक अगदी साधा, सिम्पल ठेवला आहे. यंदाच्या बजेटसाठी त्या ऑफ-व्हाइट रंगाची गोल्डन बॉर्डर असलेली साडी नेसल्या आहेत. पांढरा रंग शुद्धता, स्पष्टता आणि आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक आहे. या रंगाची साडी नेसून अर्थमंत्र्यांनी त्या सगळंकाही स्पष्टपणे मांडण्यात विश्वास ठेवतात असा विश्वास देशाला दिला आहे, असे समजते. (Nirmala Sitharaman)
साडीचा बजेटशी संबंध काय ? (Nirmala Sitharaman)
- जेव्हा जेव्हा त्या बजेट सादर करतात तेव्हा तेव्हा त्यांच्या साडीचीही चर्चा होते. प्रत्येक बजेटमध्ये त्यांच्या साडीचे रंग बदलतात. याचा अर्थही आहे. असं म्हणतात की, त्यांच्या साडीचा नेहमीच बजेटशी काहीतरी संबंध नक्कीच असतो. (Nirmala Sitharaman)
- निर्मला सीतारमण यांनी फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर 2019 साली पहिल्याच बजेटला गुलाबी रंगाची आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली होती. या साडीला मंगलागिरी साडी असं म्हणतात. गुलाबी रंग स्थिरता आणि गंभीरता दर्शवतं. स्थिरता जी विकासदरात दिसली. 2019 मध्ये 3.87 टक्के होती 2023 मध्ये ती वाढून 7.3 टक्क्यांवर पोहोचली. (Nirmala Sitharaman)
- 2020 मध्ये सीतारामन यांनी निळ्या रंगाची बॉर्डर आणि मॅचिंग ब्लाऊजसह पिवळ्या-सोनेरी सिल्क साडी परिधान केली होती. अनेकदा समृद्धीशी निगडित असलेला पिवळा रंग देशाच्या भरभराटीच्या अर्थव्यवस्थेच्या आकांक्षांचे प्रतीक म्हणून पाहिला जात होता. (Nirmala Sitharaman)
- 2021 मध्ये निर्मला सीतारामन लाल आणि पांढऱ्या रंगाच्या सिल्क पोचमपल्ली साडीत दिसल्या होत्या, ज्यात इकट पॅटर्न होता, हिरव्या रंगाची बॉर्डर होती. तेलंगणातील भूदान पोचमपल्ली येथे पारंपरिकरित्या पोचमपल्ली इकात तयार केली जाते. या ठिकाणाला ‘भारताचे रेशीम शहर’ म्हणून ओळख आहे. (Nirmala Sitharaman)
- 2022 मध्ये सीतारामन यांनी पूर्व भारतातील ओडिशा राज्यातील बोमकाई साडी निवडली होती. तपकिरी आणि लाल रंगांची सांगड घालून तयार करण्यात आलेल्या या साडीत तपकिरी टोन होता. (Nirmala Sitharaman)
- 2023 गेल्या वर्षी सीतारामन यांनी पारंपरिक लाल रंगाची साडी परिधान केली होती. सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी काळ्या रंगाची बॉर्डर आणि गुंतागुंतीचे सोनेरी काम असलेली लाल साडी निवडली. ही साडी कर्नाटकातील धारवाड भागातील हाताने विणलेली ‘इल्कल’ रेशमी साडी होती, त्यावर पारंपरिक ‘कसूती’चे काम होते. (Nirmala Sitharaman)
- 2024 मध्ये कांताने निळ्या आणि क्रीम रंगाची साडी शिवली होती. पश्चिम बंगालमध्ये शिवणकामाचा हा प्रकार प्रसिद्ध आहे. (Nirmala Sitharaman)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community