Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये अनाथाश्रमातील बालकांना मिरचीचा धूर, इस्त्रीचे चटके आणि बरेच काही…

Madhya Pradesh : अनाथाश्रमातील मुलांना लहान लहान चुकांसाठी त्यांना लाल मिरचीचा धूर देण्यात येत होता. तसेच उलटे लटकवले जात होते, असे पहाणीत उघड झाले आहे.

179
Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये अनाथाश्रमातील बालकांना मिरचीचा धूर, इस्त्रीचे चटके आणि बरेच काही...
Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये अनाथाश्रमातील बालकांना मिरचीचा धूर, इस्त्रीचे चटके आणि बरेच काही...

मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) अनाथाश्रमातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालकल्याण समितीच्या (CWC) पथकाने अनाथाश्रमालयाला अचानक भेट देऊन पहाणी केली. या वेळी अनाथाश्रमातील (orphanage) २१ मुलांना गरम इस्त्रीचे चटके देण्यात आल्याचे उघड झाले आहे. लहान लहान चुकांसाठी त्यांना लाल मिरचीचा धूर देण्यात येत होता. तसेच उलटे लटकवले जात होते, असे पहाणीत उघड झाले आहे.

(हेही वाचा – Jaspal Rana : रायफल असोसिएशनच्या हाय परफॉर्मंन्स संचालकांनी जसपाल राणाला रेंज सोडून जायला का सांगितलं?)

अचानक तपासणी केल्यानंतर प्रकार उघड

मध्य प्रदेशातील इंदूरमधील अनाथाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनीच अनाथ मुलांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. अनाथ मुलांवर क्रूर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यांनी डोक्यावर छप्पर दिले, त्या मुलांवर अत्याचार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाल कल्याण समितीच्या (Child Welfare Committee) पथकाने गेल्या आठवड्यात अनाथाश्रमाची अचानक तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी ‘व्हॅनिटी व्हॅन’; काय काय आहेत सुविधा)

छोट्या छोट्या चुकांसाठी क्रूर शिक्षा

कर्मचारी छोट्या छोट्या चुकांसाठी मुलांना क्रूर शिक्षा करत होते. मुलांनी सांगितले की, त्यांना उलटे लटकवले जाते. तसेच गरम इस्त्रीने चटके दिले जातात. याशिवाय नग्न केल्यानंतर फोटो काढण्यात आले. लाल मिरच्यांचा धूरही दिला जात असल्याचे मुलांनी सांगितले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी (Police Officers) सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.