Madhya Pradesh मधील ख्रिस्ती शाळेत हिंदू मुलांचे ब्रेनवॉश; बेकायदेशीर वसतिगृहात ४८ मुलांचे धर्मांतर

75
Madhya Pradesh मधील ख्रिस्ती शाळेत हिंदू मुलांचे ब्रेनवॉश; बेकायदेशीर वसतिगृहात ४८ मुलांचे धर्मांतर
Madhya Pradesh मधील ख्रिस्ती शाळेत हिंदू मुलांचे ब्रेनवॉश; बेकायदेशीर वसतिगृहात ४८ मुलांचे धर्मांतर

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मंडला (Mandla) जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी सक्रीय आहेत. मिशनरी तिथे शाळा आणि वसतिगृहे चालवत होते. तिथे शिक्षणाच्या नावाखाली मुलांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केले जात होते. मंडला येथील घुटास गावात साइन फॉर इंडिया (Sign for India) नावाची एक शाळा तिथे आहे. त्या वसतिगृहात राहणाऱ्या १५ मुली आणि ३३ मुलांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्यात आले आहे. या शाळेला वसतिगृह चालवण्याची परवानगी नाही, अशीही माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा : Goshala : राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) बाल संरक्षण आयोगाच्या तपासात असे दिसून आले की या मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात येत होते. ही शाळा ओडिसा येथील रहिवाशी ज्योती राज कोणत्याही परवानगीशिवाय चालवत होता. आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. ही सर्व माहिती भोपाळ मुख्यालय आणि प्रशासनाला कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.

मुलांचे ब्रेनवॉशिंग आणि धार्मिक पुस्तके

बाल संरक्षण आयोगाचे सदस्य ओंकार सिंग (Omkar Singh) यांनी सांगितले की, ही ४८ मुले ओडिशा राज्यातील अनुपपूर येथील दमोह आणि आसपासच्या भागातून याठिकाणी आली आहेत. जेव्हा बाल संरक्षण आयोगाच्या समूहाने मुलांशी संवाद साधला तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ही मुले डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याऐवजी, मुले पाद्री आणि सिस्टर बनण्याबद्दल बोलत होती. मुलांनी स्वतः सांगितले की त्यांना ख्रिश्चन धर्मात सामील होण्यास सांगितले गेले होते. तपासात असे आढळून आले की त्याचे पूर्णपणे ब्रेनवॉश करण्यात आले होते. शाळेत बायबलसह अनेक धार्मिक पुस्तके देखील सापडली, जी तेथे धार्मिक उपक्रम सुरू असल्याचा पुरावा होती. (Madhya Pradesh)

शाळेत बायबलसह प्रार्थना

आयोगाच्या पथकाला अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या. शाळेतील प्रार्थना सभा उघड्यावर होत नव्हत्या, तर छताखाली भूमिगत ठिकाणी होत होत्या. सहसा शाळांमध्ये उघड्यावर प्रार्थना केली जाते, पण इथे तसे नव्हते. टीमने मुलांसोबतच्या संभाषणाचा आणि प्रार्थनेचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता पुरावा म्हणून प्रशासन आणि भोपाळ मुख्यालयाला पाठवण्यात आला आहे.

डीपीसी केके उपाध्याय म्हणाले की, शाळेत काहीतरी गडबड सुरू आहे असा त्यांना आधीच संशय होता. जेव्हा आयोगाचे पथक घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना मुले बायबल घेऊन प्रार्थना कक्षात जाताना दिसली. मुलांनी सांगितले की ते दररोज संध्याकाळी ६:३० वाजता ख्रिस्ती प्रार्थना करतात आणि त्यापूर्वी ते दुसऱ्या धर्माचे पालन करत असत. (Madhya Pradesh)

मुलींच्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले

बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ. निवेदिता शर्मा (Dr. Nivedita Sharma) म्हणाल्या की, शाळेच्या कागदपत्रांमध्ये मुलांचा धर्म हिंदू आणि जात गोंड अशी लिहिली होती, परंतु वसतिगृहाच्या नोंदींमध्ये त्यांना ख्रिश्चन म्हणून दाखवण्यात आले होते. मुलांची पूर्ण कागदपत्रेही सापडली नाहीत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वसतिगृहातील मुलींच्या बाथरूममध्ये कॅमेरे बसवण्यात आले होते, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या ४८ मुलांना – ज्यामध्ये १५ मुली आणि ३३ मुले आहेत – मंडला, ओडिशा आणि अनुप्पपूर येथून आणण्यात आले होते. पालकांच्या परवानगीशिवाय मुलांना धार्मिक कार्यात सहभागी करून घेतले जात होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.