Conversion: सावत्र मुलाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून वडिलांनीच मुलाला साखळदंडांनी बांधले

79
Conversion: सावत्र मुलाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून वडिलांनीच मुलाला साखळदंडांनी बांधले
Conversion: सावत्र मुलाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून वडिलांनीच मुलाला साखळदंडांनी बांधले

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने व्हिडिओ व्हायरल करून त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. व्हिडिओमध्ये पीडित मुलगा साखळदंडाने बांधला गेलेला दिसला. पीडित मुलाने दावा केला की, सावत्र पिता त्याला धर्मांतर (Conversion) करण्यास भाग पाडत होता आणि मारहाण करत होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या पीडित मुलाचा शोध घेतला. मात्र चौकशीनंतर वेगळीच बाब समोर आली आहे. (Conversion)

( हेही वाचा : प्रथमच CCTV Camera च्या माध्यमातून मुंबईतील नाल्यांच्या कामांवर राहणार महापालिकेची नजर

पीडित मुलाने व्हिडिओत सांगितले की, माझा सावत्र पिता मला साखळदंडांनी बांधतो आणि मला मारहाण करतो. तसेच इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ही त्याने दबाब आणले. तसेच पीडित मुलाने पोलिसांना वाचवण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर तो उपाशी असल्याचे आणि पाणीही प्यायला दिले जात नसल्याचे पीडित मुलाने सांगितले. पीडित मुलाने सांगितले की, मी हिंदू (Hindu) असूनही सावत्र पिता मला इस्लाम धर्म (Islam Religion) स्वीकारण्यास भाग पाडत होता. (Conversion)

पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी अल्पवयीन मुलाला सोडवले आणि पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आईची चौकशी केली. तसेच पीडित मुलाला साखळदंडांनी बांधल्याबद्दल पोलिसांनी फटकारले. खांडवा (Khandwa) शहराचे एसपी अभिनव बरंगे (Abhinav Barange) म्हणाले की, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला मुक्त केले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. (Conversion)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.