Madhya Pradesh : गॅस टँकरची दोन वाहनांना धडक; ७ जणांचा मृत्यू, ३ जखमी

61
Madhya Pradesh : गॅस टँकरची दोन वाहनांना धडक; ७ जणांचा मृत्यू, ३ जखमी

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. बदनावर-उज्जैन महामार्गावरील बामनसुता गावाजवळ एका पेट्रोल टँकरनं पिकअप आणि कारला धडक दिली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. (Madhya Pradesh)

(हेही वाचा – Holi Festival 2025 : एरंडाची होळी अन् खरपुस पुरणपोळी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १२) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बदनावर-उज्जैन महामार्गावरील बामनसुता गावाजवळील रस्त्यावर चुकीच्या दिशेने एक गॅस टँकर येत होता. यादरम्यान, टँकरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार आणि जीपला धडक दिली. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला, असे धारचे एसपी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे धारच्या एसपींनी सांगितले आहे. तर, नंतर इतर ३ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर ३ जखमींना तातडीने रुग्णालयात दखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार चालू आहे. (Madhya Pradesh)

(हेही वाचा – Gautam Gambhir : गौतम गंभीर भारतीय अ संघाबरोबर इंग्लंडला जाणार?)

प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ बडनावर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही बचावकार्य सुरू करण्यासाठी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. स्थानिक नागरिकांनी या बचाव कार्यात मदत केली. यावेळी, अडकलेल्या लोकांना क्रेनच्या मदतीने वाहनांमधून बाहेर काढण्यात आले. मृत कारमधील सर्व प्रवासी मंदसौर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय. (Madhya Pradesh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.