
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये (Jabalpur) एका मुस्लिम डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तिलवाडा परिसरातील क्रशर बस्तीमध्ये, खालिद खान नावाचा एक डॉक्टर एका अल्पवयीन हिंदू (Hindu) मुलीचे ब्रेनवॉशिंग करून तिला इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडत होता. मात्र आता या डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. (Conversion)
( हेही वाचा : Kalyan Dombivli मधील ६५ बेकायदेशीर बिल्डिंगचं प्रकरण तापलं; नेमकं काय कारण? वाचा)
जबलपूरच्या या प्रकरणात, १७ वर्ष ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दि. २ एप्रिल २०२५ रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत संपूर्ण घटना सविस्तरपणे लिहिली आहे. तसेच क्लिनिकमध्ये बसून धर्मप्रचार करणाऱ्या डॉक्टर खालिदविरुद्ध तिलवाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. (Conversion)
पीडितेच्या कुटुंबाने सांगितले की, खालिद खानने त्यांच्या मुलीला फसवून आमिष दाखवले आणि तिला हिंदू (Hindu) धर्माविरुद्ध इस्लाम (Islam) स्वीकारण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणातील एफआयआरची प्रत काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या ऑगस्टपासून हे प्रकरण सुरु झाले आहे. जेव्हा मुलगी आजारी पडली तेव्हा ती जवळच असणाऱ्या खानच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली. जिथे खालिद खान (Khalid Khan) डॉक्टर होता. त्याचवेळी खालिद खानने मुलीला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने मुलीचा नंबर घेतला आणि सतत फोनवर बोलू लागला.
कुटुंबाने आरोप केला की खालिद खान (Khalid Khan) हिंदू (Hindu) धर्माबद्दल वाईट बोलत असे, तसेच इस्लाम कसा श्रेष्ठ आहे हे सांगत. त्याचबरोबर पीडितेला हिंदू धर्माव्यतिरिक्त वेगळे शिक्षण, चांगले घर आणि सुविधा देण्याचे आमिष दाखवून आणि धर्मांतर करण्यास खालिदने प्रोत्साहित केले. पीडित मुलगी अल्पवयीन आणि साधीभोळी होती. त्यामुळे तिची दिशाभूल करणे खालिदला सहज जमले. खालिद खानच्या सांगण्यावरून तिने हिंदू धार्मिक उपासना सोडून दिली आणि मुस्लिम रीतिरिवाजांचे पालन करू लागली. (Conversion)
जेव्हा कुटुंबाने खालिद खानला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने धमकी दिली की मुलगी आता त्याच्या मनाप्रमाणे वागेल. तो म्हणाला, “जर तू तिला थांबवलेस तर मी मुलीला तुझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करायला लावीन.” कुटुंब घाबरले, पण खालिद खान थांबला नाही. तो मुलीवर फोनवरून आणि गुप्तपणे भेटून दबाव आणत राहिला. परिस्थिती अशी झाली की मुलीने रमजानमध्ये रोजा ठेवायला सुरुवात केली. तिच्या शरीरावर यांचा विपरीत परिणाम झाला. याबाबत आईने विचारपूस केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. पीडितेने सांगितले की, खालिद खानच्या (Khalid Khan) सूचनेवरून हे सर्व केले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालिद खानला (Khalid Khan) अटक केली. तिलवाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी ब्रजेश मिश्रा म्हणाले की, खालिद खानविरुद्ध मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा-२०२१ च्या कलम ३ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की खालिद खानने त्यांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. (Conversion)
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूर्यकांत शर्मा (Suryakant Sharma) यांनी सांगितले की, डॉ. खालिद खान (Khalid Khan) हे तिलवाडा घाट पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या क्रशर कॉलनीमध्ये होमिओपॅथिक क्लिनिक (Homeopathic Clinic) चालवत होता. परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे उपचारासाठी जात असे. उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरने तिचे ब्रेनवॉशिंग सुरू केले आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. त्याच्यावर कारवाई केली जात आहे. सध्या त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या बजरंग दल आणि हिंदू संघटनांनी ४ एप्रिल २०२५ रोजी रस्त्यावर निदर्शने केली. लोकांनी खालिद खानला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आणि विचारले की त्याने आणखी किती निष्पाप मुलींना त्याच्या जाळ्यात अडकवले असेल. (Conversion)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community