तमिळनाडूतील सनातनविरोधी स्टॅलिन सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले. (Madras High Court) तुम्हाला तमिळनाडूतील रस्त्यांवर चर्च आणि मशीद चालते. रस्त्यावरचा नमाज चालतो; पण मग संघाचे संचलन का नाही चालत, असा बोचरा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने स्टॅलिन सरकार विचारला आहे. त्यासह मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाला परवानगी दिली. ‘संघाचे संचलन ज्या रस्त्यावरून जाते, त्या रस्त्यावर मशीद आणि चर्च आहे, असे कारण देत पोलिसांनी संचलनाला परवानगी नाकारली. मशीद आणि चर्चला जर संरक्षण देता येऊ शकते, तर संचलनाला संरक्षण का देता येत नाही ?’, असा सवाल न्यायमूर्ती जयचंद्रन यांनी केला. (Madras High Court)
(हेही वाचा – Scheduled Tribes : अनुसूचित जमातीच्या समावेशासाठी समिती करणार स्थापन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय)
संघाच्या संचलनाविषयी तमिळनाडू पोलीस योग्य वेळेत निर्णय घेत नाहीत. हे प्रकरण हायकोर्टात आले की, काही तास आधी परवानगी नाकारली जाते. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा खेळ सुरू आहे, पण हा खेळ आता चालणार नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जयचंद्रन यांनी स्टालिन सरकारला सुनावले आहे. (Madras High Court)
‘देशातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी कुठलीही कारणे देऊन चालणार नाही’, असेही न्यायमूर्ती जयचंद्र यांनी स्टॅलिन सरकारला ठणकावले. न्यायालयाने संघाच्या 22 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर या दोन्ही दिवसांच्या संचालनाला परवानगी दिली. तसेच या संचलनांना पोलिसांनी पुरेसे संरक्षण द्यावे, असे आदेशही न्यायमूर्ती जयचंद्रन यांनी दिले.
तमिळनाडूमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला प्रतिबंध नाही; पण संघाच्या कार्यक्रमांमध्ये मात्र विशिष्ट कारणे देऊन नेहमीच अडथळा आणला जातो. या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये ठणकावले आहे. (Madras High Court)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community