प्रयागराजमधील मदरसा जामिया हबीबिया मशीद आझममध्ये बनावट नोटा छापल्या गेल्यानंतर आणखी एक मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांच्या पथकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक पुस्तके जप्त केली. या पुस्तकांमध्ये आर.एस.एस.ला देशातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना म्हटले आहे.
मदरशाचे मौलवी मोहम्मद तफसिरुल आरिफीन यांच्या खोलीत आरएसएसवर लिहिलेली आक्षेपार्ह पुस्तके आणि छायाचित्रे सापडल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. आता त्यावर गदारोळ माजला आहे. पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. आर.एस.एस.ला दहशतवादी संघटना म्हणून संबोधून मदरशांमध्ये शिकणाऱ्या अनेक राज्यांतील मुलांचे ब्रेनवॉश केले जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा – मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार; Eknath Khadse यांचा खुलासा)
कोण आहे S.M. मुशर्रफ?
अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने या विषयावर भाष्य केलेले नाही. या पुस्तकाचे लेखक एस.एम. मुश्रीफ हे महाराष्ट्र पोलिसांचे माजी महानिरीक्षक आहेत. या पुस्तकात 26/11 च्या मुंबई हल्ल्याला हिंदू आतंकवाद म्हटले आहे. पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने या पुस्तकाचे कौतुक करताना एक लेख लिहिला. हा हल्ला पाकिस्तानने केलेला नाही, असे भारताचे आयजी स्वतः सांगत आहेत. हे पुस्तक उर्दूमध्ये लिहिलेले आहे. मुश्रीफ यांनी त्याचे हिंदीत भाषांतर केले. हिंदी भाषांतराची प्रतही पाठवण्यात आली आहे.
यापूर्वी उत्तरप्रदेशच्याच मदरशातून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. आता अशी पुस्तके सापडली आहेत ज्यात आर.एस.एस. आणि हिंदूंचे दहशतवादी म्हणून वर्णन केले गेले आहे. पुस्तकाचे नाव पाहून पोलिसांना धक्का बसला. अलीकडेच पोलिसांनी बनावट नोटा छापण्याच्या छाप्यात मदरशाच्या मौलाना यांच्यासह 4 जणांना अटक केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community