Uttar Pradesh : मदरशात होते नकली नोटांची छपाई; मौलवीसह 4 आरोपींना अटक

198
Uttar Pradesh : मदरशात होते नकली नोटांची छपाई; मौलवीसह 4 आरोपींना अटक
Uttar Pradesh : मदरशात होते नकली नोटांची छपाई; मौलवीसह 4 आरोपींना अटक

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे नकली नोटांचा (Fake Indian currency) कारखाना मिळाला आहे. मदरशातील (Madrasa) एका खोलीत सुरू असलेल्या या कारखान्यात 100 रुपयांच्या नोटांची छपाई सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी मौलवीसह चौघांना अटक केली आहे. (Uttar Pradesh)

प्रयागराजच्या सिव्हील लाईन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात नकली नोटा छापल्या जात असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. नकली नोटा छापण्याची धागेदोरे एका मदरसापर्यंत आले. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मदरसामध्ये छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत नोटांची छापाई सुरु होती. पोलिसांनी मदरसाच्या मौलवीसह 4 जणांना अटक केली आहे. त्या ठिकाणावरून स्कॅनर, प्रिंटिंग मशीन आणि 100-100 रुपयांच्या 1 लाख 30 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

(हेही वाचा – PM Narendra Modi BKC: ‘सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा ते…’, मुंबईच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला  )

या प्रकरणी पोलिसांनी मदरशाचा प्राचार्य मौलवी मोहम्मद तफसीरुल आरीफीनसह मोहम्मद अफजल, मोहम्मद साहिद आणि मास्टर माइंड जाहीर खान उर्फ अब्दुल जाहीर यांना अटक करण्यात आली. या मदरशात गेल्या 3 महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 178,179, 180 181 182 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मौलवी मोहम्मद तफसीरूल हा ओडिशाचा रहिवाशी आहे. या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान नकली नोटाच्या (Fake Indian Currency) या रॅकेटचा संबंध आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांसोबत असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या फोनच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये महाकुंभसंदर्भात लिंक मिळाले आहेत. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभात नकली नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याची तयारी आरोपींनी केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.