Magadh Express Accident : मगध एक्स्प्रेसचे कपलिंग तुटून ट्रेनचे दोन भाग, सुदैवाने अनर्थ टळला

90
Magadh Express Accident : मगध एक्स्प्रेसचे कपलिंग तुटून ट्रेनचे दोन भाग, सुदैवाने अनर्थ टळला

पाटणाकडे जाणाऱ्या मगध एक्स्प्रेसला (20802) रविवारी दुपारी रघुनाथपूर ते तुडीगंज दरम्यान अपघात झाला. ट्रेनचे कपलिंग तुटल्याने ट्रेनचे दोन भाग झाले. जीवितहानी झाली नसली तरी अचानक घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हावडा दिल्ली रेल्वे मार्गावरील धारौली हॉटजवळ हा अपघात झाला. कपलिंग तुटल्यानंतर जोराचा धक्का बसून ट्रेन थांबली. ट्रेन थांबताच सर्व प्रवासी कसेतरी ट्रेनमधून उतरले. काहींनी आपत्कालीन खिडकीतून उडी मारली. (Magadh Express Accident)

(हेही वाचा – Fraud : पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची नऊ कोटींची फसवणूक)

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 11.07 च्या सुमारास हा अपघात झाला. 13 डबे इंजिनसह पुढे गेले, तर 9 मागे राहिले. सुमारे 70 मीटरनंतर ट्रेन थांबली. या घटनेनंतर या रेल्वे विभागाचे कामकाज ठप्प झाले. अपघातानंतर रेल्वे प्रशासनात घबराट पसरली आहे. डुमराव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर 7 मिनिटांनी अपघात डाउन मगध एक्सप्रेस नवी दिल्लीहून इस्लामपूरला जात होती. धारौली हॉल्टजवळ मोठा आवाज होऊन ट्रेनचे दोन भाग झाले. प्रथम लोको पायलट आणि गार्डला वाटले की ट्रेन रुळावरून घसरली आहे, पण जेव्हा लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली आणि खाली उतरून पाहिले, तर एस 6 आणि एस 7 डब्यांमधील कपलिंग तुटली आहे, ज्यामुळे ट्रेन दोन भागांमध्ये विभागली. (Magadh Express Accident)

(हेही वाचा – छत्रपती शिवरायांविषयी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर DCM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला तीव्र संताप)

रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी निरीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. ट्रेनचा पुढचा भाग रघुनाथपूर स्टेशनवर आणण्यात आला आहे. तर मागचा भाग रुळावरच होता. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शारस्वती चंद्रा यांनी सांगितले की, नवी दिल्लीहून इस्लामपूरला जाणाऱ्या मगध एक्स्प्रेसचं (20802) कपलिंग तुटलं. त्यामुळे टुडीगंज आणि रघुनाथपूर रेल्वे स्थानकांदरम्यान तिचे दोन भाग झाले. घटना कशामुळे घडली, याचं कारण शोधण्यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत. (Magadh Express Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.