School Nutrition: शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये सापडल्या अळ्या!

181
School Nutrition: शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये सापडल्या अळ्या!
School Nutrition: शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये सापडल्या अळ्या!

यवतमाळ जिल्ह्यात शालेय पोषण (School Nutrition) आहारासंदर्भात धक्कादायक बातमी आली आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असणाऱ्या चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चॉकलेटचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिलेल्या मिलेट्स चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेतर्फे वितरित होणारा शालेय पोषण आहार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. या वादात आता नागपूरच्या कंपनीने भर घातली आहे. (School Nutrition)

(हेही वाचा –Mumbai Police दलातील ९० पोलीस हवालदारांना पदोन्नती!)

शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वाटपाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एकूण 95 पालकांपैकी 65 पालकांनी शालेय पोषण आहार घेतला. त्यांनी चॉकलेट घरी नेले त्यापैकी 25 पालकांनी चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व पालकांना धक्का बसला. पालकांनी मुख्याध्यापकांना हे चॉकलेट परत आणून दिले. (School Nutrition)

(हेही वाचा –Anita Goyal Passed Away: जेट एअरवेजचे फाउंडर नरेश गोयल यांच्या पत्नीचं निधन!)

जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 30 ग्रॅम प्रति याप्रमाणे तीन प्रकारचे चॉकलेट विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या मध्यामध्ये शाळेत ठेकेदारांनी पोहोचवले. यावेळी शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. विशेष म्हणजे हा शालेय पोषण (School Nutrition) आहार जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार कसा पाठवण्यात आला? याबद्दल प्रश्न निर्माण होतो आहे. (School Nutrition)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: फिर से खेला होबे! ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार)

कंपनीने पाठवलेल्या या तीनही चॉकलेटला कुठल्याही प्रकारची चव नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चॉकलेट व्यवस्थित राहावे त्यासाठी कुठलीही शितपेटीची व्यवस्था नाही. चॉकलेटची गुणवत्ता अतिशय खालच्या दर्जाची आहे. त्याच्यावर किंमत देखील नाही. तालुक्यातील बऱ्याच गावातून चॉकलेट खाल्ल्यानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु चॉकलेट लवकरात लवकर वाटून संपवा असा आदेश वरिष्ठांकडून आल्यामुळे मुख्याध्यापक मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत. (School Nutrition)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.