पोर्टब्लेअर आणि अंदमान-निकोबार बेटांवर मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या (एनसीएस) माहितीनुसार ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजून ४७ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी होती.
( हेही वाचा : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! जून महिन्यात या तारखेला सुरू होणार नवे शालेय वर्ष, सुट्ट्यांची संख्याही झाली कमी)
अंदमान निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के
या भूकंपामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्त हानीचे झालेली नाही. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार गेल्या १ एप्रिल रोजी या परिसरात ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचे धक्के अंदमान निकोबार बेटांवर रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी बसले होते.
उत्तर भारत हादरला!
गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेल्या आठवड्यात दिल्ली एनसीआर परिसर सुद्धा भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता. सुमारे ३० ते ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळे उत्तर भारतातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Join Our WhatsApp Community