आफ्रिकेतील मोरोक्को शहरात येथे शुक्रवारी रात्री 6.8 तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. मोरोक्को गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे किमान 296 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 153 लोकं जखमी झाले आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून 71 किमी दक्षिण-पश्चिमेस 18.5 किमी खोलवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. भारतीय वेळेनुसार हा भूकंप 3 :45 मिनिटांनी झाला.
या भूकंपामुळे शहरातील जुन्या भागाचे नुकसान झाले आहे. मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मिडियावर या भूकंपाशी संबंधित व्हिडियो आणि फोटो शेअर केले आहेत. यामध्ये इमारती कोसळल्यानंतर वातावरणात सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूळ पसरलेली दिसत आहे. सोशल मिडियावर अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर लोकं धावताना आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करतानाने व्हिडियोही पोस्ट केले आहेत. माराकेश शहराला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
(हेही वाचा – Cycling : केवळ सायकलिंग करूनही होईल पोटाची चरबी कमी)
पंतप्रधानांनी ट्विट करून व्यक्त केले दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.या घटनेबाबत ट्विटद्वारे ते म्हणाले की, या आपत्तीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो.जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली आहे. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत करण्यास भारत तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community