- कोमल यादव
महाकुंभमेळ्याच्या (Maha Kumbh 2025) तयारीसाठी सुरू करण्यात आलेले कुंभ सहाय्यक चॅटबॉट (Kumbh Sah’AI’yak chatbot) हे एआय-आधारित मार्गदर्शक आहे. ते महाकुंभमेळ्याला भेट देणाऱ्या लोकांना मदत करेल.
हा डिजिटल सहकारी विनामूल्य मार्गदर्शक म्हणून काम करतो, प्रत्येक अभ्यागतांच्या प्रवासासाठी नेव्हिगेशन सहाय्य आणि परिपूर्ण सांस्कृतिक माहिती प्रदान करतो. भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओपन-सोर्स एल.एल.एम. (लार्ज लँग्वेज मॉडेल) या कंपनीद्वारे ही सेवा पुरवण्यात आली. याविषयी भाविश अग्रवाल म्हणाले, “या नाविन्यपूर्ण कल्पनेसह, आम्ही डिजिटल सक्षमीकरण आणि तांत्रिक स्वातंत्र्याच्या दिशेने भारताचा प्रवास पुढे नेऊ. एआय, चिप डिझायनिंग आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमधील आमच्या गुंतवणुकीद्वारे आम्ही भारताला प्रगतीपथावर नेत आहोत.”
चॅटबॉटचा कसा वापर करावा?
मोबाईलच्या प्लेस्टोअरवर गेल्यानंतर, तुम्हाला महाकुंभ मेळा २०२५ चे (Maha Kumbh 2025) मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागेल आणि नंतर उजवीकडील गोल आकाराच्या Sah’AI’yak chatbot वर क्लिक करावे लागेल. ज्याद्वारे तुम्हाला ११ भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडण्याची आणि नंतर दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करून स्वतःची नोंदणी करण्याची संधी दिली जाईल. हे करण्यासाठी ओ.टी.पी. द्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही नोंदणीकृत वापरकर्ता व्हाल. यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे हे विचारले जाईल. याशिवाय 8887847135 हा व्हॉट्सअॅप नंबर वापरून देखील तुम्ही या चॅटबॉटचा वापर करू शकता.
(हेही वाचा शरद पवारांनी दगा-फटक्याचे राजकारण केले म्हणून त्यांना २० फुट खाली जमिनीत गाडले; Amit Shah यांचा हल्लाबोल)
कुंभ सहाय्यक हा पंतप्रधानांच्या डिजिटल कुंभ या दूरदृष्टीचा एक प्रमुख उपक्रम आहे. हे सर्वसमावेशकता, शाश्वतता आणि एकूण आध्यात्मिक अनुभव वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाची क्षमता दर्शवते. (Maha Kumbh 2025)
चॅटबॉटची वैशिष्ट्ये
कुंभ सहाय्यक चॅटबॉट हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मराठी, मल्याळम, उर्दू, गुजराती, पंजाबी, कन्नड आणि बंगाली यांसारख्या ११ भाषांमध्ये भाविकांना मदत करणार आहे.
कुंभ (Maha Kumbh 2025) सहाय्यक चॅटबॉट महाकुंभचा इतिहास, विधी आणि महत्त्व, प्रवास आणि निवासाचे पर्याय आणि प्रयागराजच्या आसपासची प्रमुख आकर्षणे यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शक आहे. चुकीची माहिती टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community