Maha kumbh Mela 2025 : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; कशी सुरु आहे तयारी

73
Maha kumbh Mela 2025 : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; कशी सुरु आहे तयारी
Maha kumbh Mela 2025 : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; कशी सुरु आहे तयारी

बारा वर्षांतून एकदा होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) तयारी चालू आहे. (Maha kumbh Mela 2025) १३ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होईल. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा भक्तीसोहळा चालेल. यामध्ये लाखोंच्या संख्येनं देश-विदेशातून भाविक, साधू, तपस्वी येतात. या महाकुंभमेळ्याच्या परिसरामध्ये व्यवस्था आणि इतर बाबींच्या तरतुदीसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या बाबींवर काम केले जात आहे. अवघ्या दोन महिन्यांवर महाकुंभमेळा आलेला असतांना देशभरातल्या भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे. महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने स्वतंत्र जिल्हा जाहीर केला आहे. या जिल्ह्याचे पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल. त्या जिल्ह्याचे ‘महा कुंभ मेळा’ असे नामकरण करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Mahakal Temple: महाकाल मंदिरात आता ATM सारख्या मशीनमधून लाडू प्रसाद मिळणार; पेमेंट कसे होणार?)

प्रयागराजचे (Prayagraj) जिल्हाधिकारी रविंद्र कुमार मांदाद यांच्या नावे या संदर्भातले परिपत्रक जारी करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजीची ही अधिसूचना असून त्यात स्वतंत्र जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये महा कुंभ मेळा जिल्ह्याच्या सीमाही निश्चित करण्यात आल्या असून त्याचे व्यवस्थापन कसे असेल, तेही नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार महाकुंभमेळा व्यवस्थापन समितीतील प्रमुख कार्यकारी न्यायदंडाधिकारी, जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतील.

पंतप्रधान घेणार आढावा

प्रयागराजमधील ज्या भागात महाकुंभमेळा भरवला जातो, त्या संपूर्ण भागाचा एक जिल्हा घोषित करण्यात आला आहे. महा कुंभ मेळ्याचं आयोजन आणि त्या संदर्भातल्या सर्व बाबींची पूर्तता व्यवस्थितपणे व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले. महा कुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. (Maha kumbh Mela 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.