Maha Kumbh Mela 2025: देश-विदेशांतील भाविकांना उत्कंठा; १८३ देशांत पाहिली गेली वेबसाइट

98

भारतासह संपूर्ण जगात महाकुंभमेळा (Maha Kumbh Mela) प्रसिद्ध आहे. महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो. यंदा 2025 मध्ये महाकुंभमेळा (Maha Kumbh Mela) आला आहे. त्यापूर्वी 2013 मध्ये महाकुंभमेळा पार पडला होता. दरम्यान 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेळा सुरू होणार असून, 26 फेब्रुवारी 2025 रोजी या मेळ्याची सांगता होणार आहे. यंदा प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन केले जाणार आहे. यात सुमारे 40 कोटी भाविक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाकुंभमेळ्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसा भाविकांमध्ये कुंभस्नानाविषयीचा उत्साह वाढत आहे. दरम्यान, जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळावा प्रयागराज महाकुंभ (Prayagraj Mahakumbh) याविषयी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढू लागली आहे. महाकुंभच्या वेबसाइटला (Mahakumbh website) भेट दिलेल्या नेटकऱ्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. (Maha Kumbh Mela 2025)

महाकुंभची वेबसाइट हाताळणाऱ्या तांत्रिक टीमच्या प्रतिनिधीनुसार, ४ जानेवारी २०२५ पर्यंत १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक लोकांनी महाकुंभच्या वेबसाइटला (Mahakumbh website) भेट दिली आहे आणि या विषयावर माहिती घेतली आहे. या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेसह सर्व खंडातील लोकांचा समावेश आहे. १८३ देशांतील ६,२०६ शहरांतील लोकांनी या वेबसाइटला भेट दिली.

(हेही वाचा – Cold Wave In Mumbai : पुढील २ दिवस हुडहुडी भरणार; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता)

या देशातील नागरिकांची संख्या जास्त

भारत (India), अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनीतून लाखो लोक महाकुंभाच्या माहितीसाठी वेबसाइटला (website) भेट देताहेत. दरम्यान,  ६ ऑक्टोबर रोजी ही वेबसाइट सुरू करण्यात आली होती.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.