महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याची घटना दि. १९ डिसेंबर रोजी घडली. महाकुंभमेळ्यातील सेक्टर १९ मध्ये आग लागल्यानंतर, कॅम्पमध्ये ठेवलेले सिलिंडर एकामागून एक स्फोट होऊ लागले. त्यामुळे आकाशाच्या दिशेने उडणारा धूर पाहून संपूर्ण महाकुंभ मेळ्यात भक्तांचा एकच गोंधळ उडाला. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या (Vivekananda Seva Samiti Varanasi) छावणीत ही आग लागल्याची माहिती आहे. (Maha Kumbh 2025)
( हेही वाचा : Eternal Sanskriti Film Festival मध्ये 7 चित्रपटांमधून होणार भारतीय संस्कृतीचे दर्शन)
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंडर लीक झाल्यामुळे आग लागल्याचे सांगितले जातेय. त्यामुळे इतर सिलिंडर घेऊन लोक छावणीतून बाहेर पळताना दिसत आहेत. त्यातच एनडीआरएफ सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र छावणीतून धूरचे लोट उठत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या आगीत आतापर्यंत ५० छावण्यांवर परिणाम झाल्याचे सांगितले जातेय. तरी अद्याप या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. (Maha Kumbh 2025)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community