मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! १ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

कोरोना नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकजण नव्या नोकरीच्या शोधात आहेत या सर्वांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, कार्यालय सहायक, तंत्रज्ञ अशा विविध २३ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२२ आहे.

( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांनो सावधान! मोबाईल चोरांचा सुळसुळाट, १० हजार प्रवाशांचे फोन लंपास)

अटी व नियम 

  • पदाचे नाव – मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, कार्यालय सहायक, तंत्रज्ञ
  • पदसंख्या – २३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार
  • नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, नागपूर
  • अर्ज – ऑनलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर ४४००१०
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १७ सप्टेंबरपासून सुरू
  • शेवटची तारीख – १ ऑक्टोबर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here