महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ( Maha RERA Recruitment) येथे वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार पदांच्या २१ जागा रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२२ आहे.
( हेही वाचा : आता मराठी भाषेतून शिक्षण घेत व्हा ‘डॉक्टर’! सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय )
अटी व नियम जाणून घ्या…
- पदाचे नाव – वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार
- पदसंख्या – २१ जागा
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०२२
- अधिकृत वेबसाईट : https://maharera.mahaonline.gov.in/
शैक्षणिक पात्रता
- वित्त सल्लागार – एमबीए फायनान्स/ सीए, किमान ३ वर्षांचा अनुभव आर्थिक ज्ञान, CA इंटर्न आर्टिकलशिप प्रशिक्षण घेत आहे
- वरिष्ठ सल्लागार – एलएलबी, कायदेशीर सल्लागार म्हणून किमान १० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचा अनुभव, संगणक प्रवीणता
- कनिष्ठ सल्लागार – एलएलबी, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून किमान ० ते ३ वर्षांचा अनुभव, संगणक प्रवीणता
वेतनश्रेणी
- वित्त सल्लागार – ५० हजार रुपये
- वरिष्ठ सल्लागार – ६५ हजार रुपये
- कनिष्ठ सल्लागार – ३५ हजार रुपये