घोड्यावर बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता यावा अशी प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते. महाबळेश्वर येथील गजबजलेल्या पर्यटन स्थळावर लॉडविक पॉईंट येथे काल सायंकाळी धक्कादायक घटना घडली.
महाबळेश्वरात (Mahabaleshwar) प्रत्येक पाँईंटवर पर्यटकांना घोड्याची रपेट मारावीशी वाटते. लॉडवीक पाँईंटवर घोड्याची रपेट मारण्यासाठी एक ग्रुप आला होता. एका घोड्यावर पर्यटक सैर करण्यासाठी बसला आणि घोडा उधळला. त्याचा वेग अचानक वाढला आणि तो दरीच्या टोकावर गेला. त्यावेळी घोड्याचा पाय घसरला आणि घोडा दरीत कोसळला. घटना पाहणाऱ्यांच्या सर्वांच्या अंगावर शहारे आले. सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर पर्यटक आणि घोडा दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
(हेही वाचा – Panas Pilgrimage Project: शनिशिंगणापूर येथील पानस तीर्थ प्रकल्प पूर्णत्वाकडे)
2018 साली एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याने घोड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदामुळे स्थानिक नेते आक्रमक झाले होते. त्यानंतर घोडे सवारी सुरू करण्यात आली, मात्र पर्यटकाच्या या अपघातामुळे पुन्हा ‘सुरक्षिततेचे नियम धाब्यावर’ या विषयाबाबत चर्चा होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community