दोन दिवसांपूर्वी बिहारच्या (Bihar) स्पेशल टास्क फोर्सने (Special Task Force) बिहारमधून फरार जहाल नक्षलवाद्यास महाड तालुक्याच्या देशमुख कांबळे गावात पकडल्याने मोठी खळबळ माजली आहे. यामुळे आता महाड (Mahad) एमआयडीसी परिसर हा बांगलादेशींसह (Bangladeshi infiltrators) नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे का, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. त्यात अशा फितुरांना शोधणे हे रायगड पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
( हेही वाचा : SCERT च्या खासगी शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रच)
विशेष म्हणजे ज्या आरोपीला अटक करण्यात आली तो महाड (Mahad) एमआयडीसीतील एका नावाजलेल्या कारखान्यात तीन महिन्यांपासून नोकरी करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दहा वर्षांपूर्वी गुन्हा करून फरार झालेल्या नक्षलवाद्यास बिहारचे विशेष टास्क फोर्स (Special Task Force) व महाड औद्योगिक वसाहतीच्या (Mahad Industrial Estate) पोलीस पथकाने पकडले. या नक्षलवाद्यावर (Naxalite) देशद्रोह व युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच महाडमधील (Mahad) राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेल्या एका कंपनीत ८ बांगलादेशी नागरिक पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले होते. त्यामुळे बांगलादेशींसह महाड एमआयडीसी आता नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान झाले आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
एमआयडीसीत १२ हजार परप्रांतीय कामगार
दरम्यान महाड (Mahad) एमआयडीसी परिसरात जवळपास औद्योगिक वसाहतीत सुमारे १२००० पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार कार्य आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायत तसेच काही कंपन्यांचा अपवाद वगळता अनेक कंपन्यांकडून परप्रांतीय नागरिकांची सविस्तर माहिती मिळत नाही. हे लक्षात घेऊन पोलिसांनी आता या कंपन्यांमधील आपल्या नैमित्तिक भेटीत वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. जनतेमध्ये अशा पद्धतीच्या बाहेरून येणाऱ्या लोकांसंदर्भात जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. (Mahad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community