महाड औद्योगिक वसाहतीतल्या ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला होता. सकाळी साडे दहाच्या सुमाराला कंपनीत हा स्फोट झाला. मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. यामध्ये अडकलेल्या ११ कामगारांपैकी ४ जणांचे मृतदेह आढळून आलेत. उर्वरित सात कामगारांचा शोध सध्या सुरु आहे.कामगारांना शोधण्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाला सात तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. (Mahad Fire)
आग विझवली गेली आहे पण आतील मशिनरी जोपर्यत थंड होत नाहीत तोपर्यत शोधणे फार कठीण आहे. या ठिकाणी एनडीआरएफ च्या टीमला बोलावले आहे.ज्या प्लॅंट मध्ये स्फोट झाला, त्या प्लॅंटचे ट्रक्चर दबल्याने आत शोध पथकाला आत जाता येत नाही. शोधपथकाचं काम नेमकं कितपत झालं याची माहिती प्रशासन अधिकृतपणे देत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले. अपघाताच्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश आपण दिल्याचं यावेळी उदय सामंत यानी सांगितलं. चौकशीनंतर अपघातामागचं कारण स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.
(हेही वाचा : Maratha reservation : अंतरवालीतील सभास्थानामुळे नुकसान झालेल्या ४४१ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यानी दिली ‘ही’ भेट)
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू, असं आश्वासन यावेळी उदय सामंत यांनी दिलं. महाडमध्ये NDRF च्या कॅम्पची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी मिळाली असून त्यासाठीही राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे भविष्यात पुण्याहून एनडीआरएफचं पथक बोलावण्याची वेळ येणार नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community