Mhada Allotment : ऑक्टोबरमध्ये कोकण, पुणे, औरंगाबादमधील १० हजार घरांसाठी सोडत

घराच्या किमतींमध्ये होणार घट

139
Mhada Allotment : ऑक्टोबरमध्ये कोकण, पुणे, औरंगाबादमधील १० हजार घरांसाठी सोडत
Mhada Allotment : ऑक्टोबरमध्ये कोकण, पुणे, औरंगाबादमधील १० हजार घरांसाठी सोडत

म्हाडाच्या Mhada Allotment सुमारे १० हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या अंदाजे साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या अंदाजे ६०० घरांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल आणि ऑक्टोबरमध्ये लॉटरीचा निकाल जाहीर होईल.

घराच्या किमतींमध्ये होणार घट ?
म्हाडाच्या Mhada Allotmentमुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांची किंमत थोडीफार कमी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे नव्याने सोडत काढण्यात येणाऱ्या घरांचे दर कमी असणार का, हे पाहावे लागेल. म्हाडाला गृहप्रकल्पांसाठी मोफत जमीन मिळत असल्याने घरांच्या किंमती खासगी विकासकांच्या प्रकल्पाहून कमी असायला हव्यात. राज्य सरकार म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच, पुढील घरांच्या सोडतीतील घरांच्या किंमती इतर घरांपेक्षा कमी असतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे आता म्हाडाकडून त्याची अंमलबजावणी होणार का, हे पाहावे लागेल.
२५ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० हजार घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक ५००० घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही घरे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे.  एकूणच दसऱ्याच्या मुहूर्तावर इच्छुकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.