Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲपवर मोठी कारवाई; प्रमोटर सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैदेत

205
Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲपवर मोठी कारवाई; प्रमोटर सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैदेत
Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲपवर मोठी कारवाई; प्रमोटर सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैदेत

महादेव बेटिंग ॲपची (Mahadev Betting App) पाळेमुळे खणून काढली जात आहेत. महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला लवकरच पकडून भारतात आणले जाऊ शकते. संयुक्त अरब अमिराती (यूएई) अधिकाऱ्यांनी चंद्राकरचे दुबईतील ठिकाण शोधून काढले असून त्याला नजरकैदेत ठेवले आहे.

(हेही वाचा – Hawkers Policy Railway : रेल्वेची फेरीवाल्यांविरोधात मोठी मोहीम; ३ कोटींची दंडवसुली)

नुकतेच महादेव ॲपचा (Mahadev Betting App) विषय विधानसभेतही झाला होता. त्या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ महिन्यांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) हा महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या दोन मुख्य आरोपी मालकांपैकी एक आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे. चंद्राकर दुबईतूनच आपला व्यवसाय चालवतो.

महादेव ॲप प्रकरण (Mahadev Betting App) हा ऑनलाइन बेटिंग (Online betting) प्लॅटफॉर्मचा समावेश असलेला हाय-प्रोफाइल घोटाळा आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे पोकर, पत्ते खेळ, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट अशा विविध खेळांमध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळण्याची संधी मिळते.

काय आहे प्रकरण ?

रायपूर येथील प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (Prevention of Money Laundering Act) च्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाच्या आधारे महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा तपास सुरू आहे. देशातील केंद्रीय संस्थांद्वारे तपास केला जात आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या अन्वेषणानुसार सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल नावाच्या आणखी एका प्रवर्तकाने संयुक्त अरब अमिरातीमधील (United Arab Emirates) त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून महादेव सट्टेबाजी ॲप चालवले.

या दोघांनी या ॲपच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग आणि हवाला व्यवहार केले आहेत. या प्रकरणात किमान 6000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला उप्पलला दुबईतील स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी उप्पलला भारतात आणण्यासाठी अधिकारी संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे तपास संस्थेने म्हटले होते. (Mahadev Betting App)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.