उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात बुधवारी तिसरे अमृतस्नान (शाही) संपन्न झाले. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर होणाऱ्या या अमृतस्नानात दुपारपर्यंत सुमारे 5 कोटी 71 लाख भाविक सहभागी झाले होते. यावेळी भाविकांवर आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्री झालेल्या चेंगराचेंगरीची घटना वगळता दिवसभरात शांतता आणि शिस्तीत अमृतस्नान संपन्न झाले. (Mahakumbh 2025)
(हेही वाचा – बुरखा घालून बोर्डाच्या परीक्षा देण्यावर बंदी घाला; Nitesh Rane यांचे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना आवाहन)
प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 रोजी प्रारंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत 19.90 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार, 29 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 5 कोटी 71 लाख भाविकांनी संगमात स्नान केले होते. यामध्ये सुमारे 10 लाख कल्पवासी सहभागी झाले होते. प्रयागराज कुंभमेळ्यात एकूण 6 अमृत स्नाने होतील. महाकुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान 13 जानेवारीला, दुसरे अमृत स्नान 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीला, तिसरे स्नान 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला, चौथे शाही स्नान 2 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला, पाचवे शाही स्नान माघ पौर्णिमेला 12 फेब्रुवारी रोजी होईल आणि शेवटचे शाही स्नान 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होईल. (Mahakumbh 2025)
(हेही वाचा – राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर; उपाययोजना करण्याचे गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचे आश्वासन)
दरम्यान मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर बुधवारी अमृत स्नान उत्सवानिमित्त, उत्तर प्रदेश सरकारकडून भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सकाळी 6.30 वाजता होणारा पुष्प वर्षाव रद्द करण्यात आला. परंतु, अमृतस्नानासाठी येणाऱ्या भाविकांवर आकाशातून पुष्पवर्षाव करण्यात आला. तसेच भाविकांचे स्नान झाल्यानंतर साधू-संतांच्या आखाड्यांनी देखील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. (Mahakumbh 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community