कुंभक्षेत्रात (Prayagraj) १४ जानेवारी रोजी झालेल्या अमृतस्नानासाठी ३ कोटींहून अधिक भाविक आले होते. त्यांच्यासाठी तब्बल दीड लाख शौचालये कुंभक्षेत्रात उभारण्यात आली होती. अमृतस्नानाच्या (Amrit Snan) दिवशी या शौचालयांचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या सर्व शौचालयांच्या स्वच्छतेचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. स्वच्छता कर्मचार्यांकडून या शौचालयांची स्वच्छता चालू आहे. (Mahakumbh 2025)
(हेही वाचा – Chhattisgarh Naxalites : छत्तीसगडमध्ये नलक्षवाद्यांकडून पुन्हा IED स्फोट, बीएसएफचे 2 जवान जखमी)
शौचालयांच्या स्वच्छतेसह कुंभक्षेत्रातील मार्गाची स्वच्छता, भव्य त्रिवेणी संगमाच्या काठाची स्वच्छता हेही प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. १५ जानेवारी या दिवशी पहाटेपासून हजारो स्वच्छता कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत.
त्रिवेणी संगम आणि गंगा नदीच्या भव्य वालूकामय भागात ‘चकर्डप्लेट’द्वारे (लोखंडाच्या मोठ्या पट्टया) रस्ते बांधण्यात आले आहेत. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाळू येत आहे. वार्यामुळे ही वाळू उडून गाडीचालक, तसेच रस्त्यावर येणार्या-जाणार्या भाविकांच्या डोळ्यांमध्ये जाते. वाळू उडू नये, यासाठी प्रशासनाकडून कुंभक्षेत्रातील सर्व रस्ते झाडण्यात येत आहेत, तसेच त्यावर पाणी मारण्यात येत आहे.
अमृतस्नानाच्या दिवशी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाळूमिश्रित माती साचली आहे. अमृतस्नानाच्या दिवशी काही प्रमाणात पाऊस पडल्यामुळे वाळूमिश्रित माती रस्त्यांवर चिकटली आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचार्यांना रस्त्यांवरील ही माती फावड्याने काढावी लागत आहे. कुंभक्षेत्रात पसलेल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या या रस्त्यांवरील माती काढणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. (Mahakumbh 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community