MahaKumbh 2025: प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर; प्रयागराज रेल्वेस्थानक केले बंद

124

प्रयागराजमध्ये (Prayagraj) त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरु आहे. आतापर्यंत ३ अमृतस्नान झाली आहेत. पुढील पौर्णिमा १२ फेब्रुवारी या दिवशी आहे. असे असले, तरी भाविकांचा ओघ प्रयागराजमध्ये सुरुच आहे. भाविकांच्या गर्दीमुळे (MahaKumbh 2025) प्रयागराजचे रस्ते बंद झाले असून आता प्रयागराज संगम रेल्वे स्थानकही बंद करण्यात आले आहे.

प्रयागराजमध्ये (uttar pradesh) वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. प्रयागराजमध्ये येणाऱ्या सातही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या २४ तासांपासून भाविकांच्या वाहनांचा ओघ वाढला असून, लोक १०-१५ तासांपासून वाहनांमध्ये अडकून पडले आहेत.

(हेही वाचा – Population Jihad : केरळमध्ये १३ वर्षांत मुस्लिमांची लोकसंख्या हिंदुंच्या तुलनेत पाचपट वाढली)

प्रयागराजमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी ११ फेब्रुवारीपासून प्रयागराज संगम रेल्वे स्थानक (Prayagraj Sangam Railway Station) बंद करणे अपेक्षित होते. प्रयागराजकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढत असल्याने १० फेब्रुवारीलाच प्रयागराज संगम रेल्वेस्थानक पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहे. महाकुंभ सुरू असलेल्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर प्रयागराज संगम रेल्वे स्थानक आहे. दारागंज (Daraganj (DRGJ) Railway Station) आणि प्रयागराज ही दोन्ही वेगवेगळी स्थानके असून, दारागंज रेल्वे स्थानक आधीच बंद करण्यात आले आहे. आता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

आतापर्यंत तीन अमृत स्नान झाले असून, यापुढे मर्यादित संख्येने भाविक (Prayagraj) येण्याची प्रशासनाचा अंदाज होता. पण, मागील तीन दिवसांत भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनावर भार वाढला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.