MahaKumbh 2025: महाकुंभमेळ्यात भक्तांना असा मदत करेल Google Map; जाणून घ्या हे 5 फीचर्स

654
भारतासह संपूर्ण जगात महाकुंभमेळा (Maha Kumbh Mela) प्रसिद्ध आहे. महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो. यंदा 2025 मध्ये महाकुंभमेळा येणार आहे. त्यापूर्वी 2013 मध्ये महाकुंभमेळा पार पडला होता. दरम्यान 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेळा सुरू होणार असून, 26 फेब्रुवारी 2025 रोजी या मेळ्याची सांगता होणार आहे. यंदा प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन केले जाणार आहे. यात सुमारे 40 कोटी भाविक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाकुंभमेळ्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसा भाविकांमध्ये कुंभस्नानाविषयीचा उत्साह वाढत आहे. 114 वर्षांनंतर तीर्थक्षेत्र (Maha Kumbh Mela Pilgrimage) प्रयागराजमध्ये (Maha Kumbh Mela 2025 Prayagraj) पूर्ण कुंभाचा दुर्मिळ योग घडणार आहे. याचवेळी महाकुंभ मेळ्यातील इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही गूगल मॅपच्या मदतीने इतर ठिकाणी पोहोचू शकता. त्यासाठी गूगल मॅपचे इंटर फीचर्स जाणून घ्या. (MahaKumbh 2025)
आपण देखील या महाकुंभात सहभागी व्हावं असं प्रत्येकाची इच्छा आहे. पण महाकुंभ मेळ्यात आपल्याला रस्तांबाबत माहिती कोण देणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर तुमच्या सर्वांच्या या प्रश्नाचं उत्तर आहे गुगल मॅप. आजच्या काळात गुगल मॅप ही लोकांची गरज बनली आहे. आजच्या काळात प्रत्येकाला गुगल मॅपची माहिती आहे. अशी काही वैशिष्ट्ये गुगल मॅपमध्ये देखील उपलब्ध आहेत, जी प्रवासादरम्यान खूप उपयुक्त आहेत. जर तुम्ही यावेळी कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर गुगल मॅपची ही 5 फीचर्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील.

(हेही वाचा – National Sports Awards : मनु भाकरसह गुकेशलाही खेलरत्न, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर)

स्ट्रीट व्ह्यू टाईम ट्रॅव्हल
गुगल मॅपमध्ये स्ट्रीट व्ह्यू टाईम ट्रॅव्हल नावाचे एक फीचर आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही अनेक वर्षांपूर्वी एखादं ठिकाणं कसं दिसत होतं, याबाबत माहिती घेऊ शकता. तुम्ही काळाच्या मागे वळून पाहू शकता आणि जुन्या काळात एखादे ठिकाण कसे दिसत होते ते पाहू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही महाकुंभ मेळा आयोजित केला जाणारं ठिकाणं पूर्वी कसं होतं, हे तुम्ही पाहू शकता.
ऑफलाईन नेव्हिगेशन फीचर
गुगल मॅपचे ऑफलाईन नेव्हिगेशन फीचर आपल्याला आपल्या प्रत्येक प्रवासात फायद्याचं ठरणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय देखील गुगल मॅपचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवर जाऊन आवश्यक असणारे नकाशे डाऊनलोड करावे लागणार आहेत. यानंतर तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसताना देखील गुगल मॅपचा वापर करू शकणार आहात.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन)

नेविगेशन वॉइस कमांड
गुगल मॅपमधील नेविगेशन वॉइस कमांड फीचर AI संबंधित आहे. यामध्ये तुम्ही प्रवास करताना जेमिनी एआयच्या मदतीने तुमच्या लोकेशनवर नेव्हिगेट करू शकता. हे नेव्हिगेशन व्हॉईस कमांडच्या मदतीने करता येते.
इलेक्ट्रिक वेहिकल सेटिंग फीचर
गुगल मॅपचे नवीन फीचर तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची अचूक माहिती देईल. या फीचरच्या मदतीने इलेक्ट्रिक कारचे मालक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतील. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंग प्लगनुसार सर्च रिझल्ट दाखवते.
नियर बाय हॉटेल
तुम्ही गुगल मॅपच्या (Google Map) मदतीने कोणत्याही हॉटेलमध्ये स्वत:साठी जेवणाचे टेबल बुक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवर जाऊन निअर बाय हॉटेल सर्च करावे लागेल. तुम्हाला रेस्टॉरंटची यादी मिळेल. इथे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हॉटेलमध्ये जेवणाचे टेबल बुक करू शकता.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.