Mahakumbh 2025 : श्रीकृष्णजन्मभूमीसाठी संघर्ष करा; महाकुंभमध्ये संत-महंतांचे आवाहन

44
Mahakumbh 2025 : श्रीकृष्णजन्मभूमीसाठी संघर्ष करा; महाकुंभमध्ये संत-महंतांचे आवाहन
Mahakumbh 2025 : श्रीकृष्णजन्मभूमीसाठी संघर्ष करा; महाकुंभमध्ये संत-महंतांचे आवाहन

श्रीकृष्णाची जन्मभूमी हिंदूंची आहे आणि ती हिंदूंची रहाण्यासाठी हिंदूंना संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये हिंदुतत्वनिष्ठ आणि सनातनी हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन प.पू. बालकृष्ण महाराज यांनी केले.

प्रयागराज (Prayagraj) येथील कुंभक्षेत्री २३ जानेवारी या दिवशी श्रीकृष्णजन्मभूमी (shri krishna janmabhoomi temple) संघर्ष न्यासाच्या वतीने विराट धर्म संसद पार पडली. या वेळी व्यासपिठावर महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद सरस्वती महाराज, श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराचे मुख्यवादी पंडित दिनेश शर्मा (फलाहारी), संसदेचे आचार्य रमाकांत गोस्वामी, राष्ट्रीय मुख्य संरक्षक वेदप्रकार कटियार, महंत महोहिनी शरण महाराज आदी संत, महंत उपस्थित होते. (Mahakumbh 2025)

(हेही वाचा – Eknath Shinde : शिवसेनेच्या मेळाव्याला दोन बड्या नेत्यांची अनुपस्थिती चर्चेत)

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवून हिंदूंमध्ये चेतना जागृत करावी, देशातील रस्त्यांच्या वाटेत मशीद, क्रबस्तान, मदरशांचे झालेले अतिक्रमण सरकारने त्वरित काढावे, संपूर्ण भारतात गोहत्यांवर प्रतिबंध घालून तिला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा द्यावा, तसेच इस्लामी वक्फ बोर्डाला पूर्णतः रहित करावे, अशी गर्जना येथे पार पडलेल्या ‘धर्मसंसदे’त करण्यात आली.

या वेळी महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘धर्मांधांकडून भारताचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तेथे हिंदूंवर अनन्वित अत्याचार चालू आहेत. तेथे आतापर्यंत १६ लाख हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. बांगलादेशाप्रमाणे भारतात हिंदूंची तशी स्थिती न होण्यासाठी हिंदूंनी जागृत होऊन संघटित होणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांच्या भरवशावर हिंदूंनी अवलंबून न रहाता स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. निधर्मी आणि धर्मांध सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात मुसलमानांची संख्या लक्षणीय वाढत आहे, हिंदू अल्पसंख्य होत आहेत. त्यामुळे येत्या १० वर्षांत हिंदूंनी जागृत होऊन सनातन धर्मासाठी लढण्यासाठी सिद्ध न झाल्यास भारताचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही.’’ (Mahakumbh 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.