Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यातील तिसऱ्या अमृतस्नानाला सुरूवात ; संगमावर पवित्र स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी

52
Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यातील तिसऱ्या अमृतस्नानाला सुरूवात ; संगमावर पवित्र स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी
Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यातील तिसऱ्या अमृतस्नानाला सुरूवात ; संगमावर पवित्र स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी

प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभात (Mahakumbh 2025) वसंत पंचमीनिमित्त (Vasant Panchami) आज (3 फेब्रु.) अमृतस्‍नान होत आहे. या अमृतस्‍नानाचा ब्रह्म मुहूर्त (Brahma Muhurta) सकाळी ५.२३ ते ६.१६ वाजेदम्यान आहे. स्‍नानासाठी काली मार्ग, धरण आणि संगमकडे जाणाऱ्या रस्त्यांसह मेळा परिसरातील मुख्य रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मौनी अमावस्‍येच्या दिवशी चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाल्याने या अमृत स्‍नान पर्वात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रयागराज प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्‍यानुसार संगम तटावर २८ मोक्‍याची ठिकाणे बनविण्यात आली आहेत. (Mahakumbh 2025)

याठिकाणी पोलिसांसोबतच शीघ्र कृती दल आणि निमलष्करी दल यांचे संयुक्‍तपथक तैनात असणार आहे. झालेल्‍या दुर्घटनेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान ५ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. गर्दीचे व्यवस्थापन यावर प्रशासनाचे लक्ष असेल. मेळ्यात व्हीआयपी तसेच वाहनांना प्रवेश मिळणार नाही. पोलिसांची तैनाती प्रभावी राहावी यासाठी ६ टप्प्यांतील योजना आखली आहे. ११ संवेदनशील ठिकाणांवर अतिरिक्त पोलिस दल असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या आदेशानुसार गर्दीवर नियंत्रणासाठी ‘ऑपरेशन इलेव्हन’योजना आहे. (Mahakumbh 2025)

वसंत पंचमीच्या अमृत स्नानावरून प्रयागराज मंडळाच्या डॉक्टरांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. १२०० हून जास्त मेडिकल फोर्स कुंभात तैनात केले आहे. स्वरुपरानी नेहरू रुग्णालयातील ५०० कर्मचारी व टीबी सप्रू चिकित्सालयाच्या कर्मचाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Mahakumbh 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.