Mahakumbh 2025 Video : महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर तरुणी तुम्ही पाहिलीत का ? व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

113
Mahakumbh 2025 Video : महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर तरुणी तुम्ही पाहिलीत का ? व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
Mahakumbh 2025 Video : महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर तरुणी तुम्ही पाहिलीत का ? व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

महाकुंभ मेळ्याच्या (Mahakumbh 2025 Video) निमित्तानं सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओमध्ये कुंभमेळा म्हणजे काय? त्याचं महत्व काय? याबद्दल माहिती दिली जातेय. तर काहींमध्ये जगभरातून आलेल्या साधू आणि साध्वींच्या मुलाखती दाखवल्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या एका सुंदर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Mahakumbh 2025 Video)

ही तरुणी दिसायला इतकी सुंदर आहे की, अक्षरश: तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकं गर्दी करत आहेत. काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून हर्षा रिचारिया चर्चेत होती. त्यानंतर आता या माळा विकणाऱ्या तरुणीची चर्चा आहे. या १६ वर्षीय मुलीचं नाव मोनालिसा (Monalisa) असं आहे. ती मुळची इंदौरची (Indore) असून माळा विकण्यासाठी कुंभमेळ्यात आली आहे. (Mahakumbh 2025 Video)

तिचे व्हायरल होत असलेले व्हिडीओ तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. पण हे व्हिडीओ पाहून काही नेटकरी मात्र नाराज झाले आहेत. धार्मिक स्थळी अशा प्रकारचे फोटो सेशन करू नका अशा सूचना देत आहेत. तर काही जण या नाराज मंडळींना ट्रोल करत सौंदर्याची प्रशंसा करायला शिका अशी उलट शिकवण त्यांना देत आहेत. (Mahakumbh 2025 Video)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.