प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वात येणार्या भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे विनापरवानगी उडवण्यात येणारे ड्रोन निष्क्रीय करण्यात येणार असून असे ड्रोन उडवणार्यांना कठोर कारवाईही केली जाणार आहे. यंदाच्या महाकुंभपर्वात देश-विदेशांतून ४० कोटी भाविक येण्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला असून भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे. (Mahakumbh)
(हेही वाचा- शस्त्र सोडा आणि मुख्य प्रवाहात या; Amit Shah यांचा नक्षलवाद्यांना इशारा)
महाकुंभपर्वात १४ डिसेंबर या दिवशी २ बेकायदेशीर ड्रोन पकडून ते निष्क्रीय करण्यात आले. पोलिसांनी संबंधितांना नोटिसाही बजावल्या आहेत. कुंभ परिसरात ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी या अत्याधुनिक यंत्रणेने परवानगीशिवाय उड्डाण करणारी दोन डोन ड्रोन्स यशस्वीपणे पाडून निष्क्रिय या ड्रोन्सच्या ऑपरेटरर्सला नोटीस बजवण्यात आल्या, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले. महाकुंभ नगर परिसरात पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडवले जाणार नाहीत. कोणत्याही ड्रोन ऑपरेशनसाठी पोलिसांकडून आधीच परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय ड्रोन उड्डाण करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. महाकुंभात जगभरातील जवळपास ४५ भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा मेळावा आहे. (Mahakumbh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community