उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे दि. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात गाईला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा म्हणून महायज्ञ होणार आहे. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Jagadguru Shankaracharya Swami Avimukteswarananda Saraswati) यांच्याकडून या महायज्ञाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. (Mahakumbh)
( हेही वाचा : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये Zero Prescription Policy कागदावरच)
प्रयागराज (Prayagraj) येथे दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी कालावधीत महाकुंभमेळा (Mahakumbh) होणार आहे. यादरम्यान गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिबिरात आयोजित करण्यात आलेल्या या मंडपात ३२४ ‘कुंडे’ आणि ९ ‘शिखर’ आहेत. हा यज्ञ दररोज ९ तास याप्रमाणे महिनाभर चालणार आहे. या महायज्ञात ११०० पुरोहित सहभागी होणार आहेत. महाकुंभमेळा (Mahakumbh) दर १२ वर्षांनी येत असतो. जानेवारी २०२५ मध्ये कुंभमेळा आला आहे. त्यापूर्वी २०१३ मध्ये कुंभमेळा पार पडला होता. प्रयागराज शहरात महाकुंभमेळा २०२५ ची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे.(Mahakumbh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community