Mahakumbh मेळ्यात पाहायला मिळणार पाच देशांच्या संस्कृतीचा मिलाफ

38
Mahakumbh मेळ्यात पाहायला मिळणार पाच देशांच्या संस्कृतीचा मिलाफ
Mahakumbh मेळ्यात पाहायला मिळणार पाच देशांच्या संस्कृतीचा मिलाफ

महाकुंभ (Mahakumbh) मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये (Prayagraj) रेलचेल वाढली आहे. त्यातच प्रयागराजमध्ये यावेळी पाच देशांच्या संस्कृतीचा अनोखा मिलाफ पाहावयास मिळणार आहे. यात जपान, रशिया, युक्रेन, नेपाळ या देशातील साधू-महंतही या अद्भुत मेळ्यात सहभागी होणार आहे. दि. १३ जानेवारीपासून या मेळ्यास प्रारंभ होत आहे. (Mahakumbh)

( हेही वाचा : Municipal Elections : शिवसेना उबाठा गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया)

दरम्यान महाकुंभ (Mahakumbh) मेळ्याच्या ठिकाणी सेक्टर १८ मध्ये पाच देशांच्या संस्कृतीचा मिलाफ बघण्यास मिळणार आहे. या देशातील संत-महंत मेळा सुरु होण्याआधीच प्रयागराजमध्ये (Prayagraj) दाखल होणार आहेत. जपानमधून (Japan) माता केको आईकावा ऊर्फ कैला नंदगिरी या बौद्ध भिक्खूंसह कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. युक्रेनमधून स्वामी विष्णूदेवानंद आपल्या भाविकांसह प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. वेद-मंत्रोच्चारासह पूर्वज आणि आत्म्यांचीही पूजा या सोहळ्यात करण्यात येणार आहे. (Mahakumbh)

त्यामुळे प्रयागराजमधील (Prayagraj) महाकुंभात (Mahakumbh) पाच देशांच्या संस्कृतीचा संगम एकाच छताखाली अनुभवण्यास मिळणार आहे. देश विदेशातील साधू-संताच्या सुविधांसाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. विदेशी साधू-संतांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वुडन कॉटेजमध्ये ते वास्तव्य करतील. महामंडलेश्वर योगमाता, महामंडलेश्वर चेतना गिरी, योगमाता श्रद्धानंद गिरी, शैलेशानंद महाराज (Shaileshananda Maharaj), खप्पर बाबा (Khapar Baba) आदी प्रमुख महंत आणि साधूंची विशेष उपस्थिती असणार आहे. (Mahakumbh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.