Mahakumbh Stampede : तिसऱ्या अमृत स्नाननिमित्त पोलिस हाय अलर्टवर ; कडक तपासणी सुरू

39
Mahakumbh Stampede : तिसऱ्या अमृत स्नाननिमित्त पोलिस हाय अलर्टवर ; कडक तपासणी सुरू
Mahakumbh Stampede : तिसऱ्या अमृत स्नाननिमित्त पोलिस हाय अलर्टवर ; कडक तपासणी सुरू

प्रयागराज (Prayagraj) महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीची (Mahakumbh Stampede) तपासणीचा उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने वेग वाढवला आहे. महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागे काही कट कारस्थान होता का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासाचा एक भाग म्हणून, यूपी एसटीएफ संगम नाक्याभोवती सक्रिय असलेल्या १६ हजार मोबाइल क्रमांकांच्या डेटाची तपासणी करत आहे. चौकशीत असे दिसून आले आहे की, यापैकी बरेच क्रमांक सध्या बंद आहेत. (Mahakumbh Stampede)

हेही वाचा-Union Budget 2025 : केंद्राचे मुंबई मेट्रोला पाठबळ; अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी मोठी तरतूद

महाकुंभमेळा परिसरात बांधलेल्या कमांड अँड कंट्रोल रूमच्या सीसीटीव्हीवरून फेस रेकग्निशन अॅपद्वारे संशयितांची ओळख पटवली जात आहे. वसंत पंचमी स्नानाबाबत उत्तर प्रदेश (UP) पोलीस हाय अलर्टवर आहेत. दरम्यान, वसंत पंचमीनिमित्त सोमवारी सकाळी होणाऱ्या तिसऱ्या अमृत स्नानापूर्वी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौथे महास्नान १२ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेला होणार आहे, तर शेवटचे स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. (Mahakumbh Stampede)

हेही वाचा-माओवादमुक्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी Maoism ग्रस्त भागासाठी अर्थसंकल्पात ३,४८१ कोटींची तरतूद

वसंत पंचमीनिमित्त (Vasant Panchami) महाकुंभात होणारे तिसरे अमृत स्नान सोमवारी (3 फेब्रु.) पहाटे ५ वाजता सुरू होईल. सर्वप्रथम पहाटे ४ वाजता, पंचायत आखाडा अमृत स्नानासाठी संगम घाटावर पोहोचेल. यानंतर, एक-एक करून इतर १२ आखाडे देखील संगमात स्नान करतील. मौनी अमावस्येच्या दिवशी, २९ ते ३० जानेवारी दरम्यान रात्री २ वाजताच्या सुमारास, प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी झाली होती. घटनेच्या सुमारे १६ तासांनंतर, महाकुंभ प्रशासनाने ३० भाविकांचा मृत्यू आणि ६० जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. (Mahakumbh Stampede)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.