महालक्ष्मी पुलाचा विस्तार आता पूर्व आणि पश्चिम दिशेने, आणखी १२० कोटी रुपये करणार खर्च

महालक्ष्मी स्थानकाजवळील बांधकाम सुरु असलेल्य पूर्वेकडील केबल स्टेड रेल्वेवरील पुलाचा विस्तार हा आता एन.एम. जोशी मार्ग जंक्शन ते एस ब्रीज जंक्शन अर्थात गंगाराम तळेकर चौकापर्यंत केला जाणार आहे. याशिवाय हाजीअली जंक्शन जवळील महालक्ष्मी रेसकोर्स वाहनतळामधून एक मार्गिकेचे बांधकामही या केबल स्टेड पुलाला जोडली जाणार आहे. या विस्तारीत पुलांच्या बांधकामावर सुमारे १२० कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे. यापूर्वीच्या केबल स्टेड पुलाच्या बांधकामावर सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

दोन पुलांची बांधकामे हाती घेण्यात आली

महालक्ष्मी रेल्वे स्थानक लगतच्या परिसरातील आणि संत गाडगे महाराज चौक परिसरातील (सात रस्ता चौक) या भागातील वाहतूक कोंडी सुटावी. याकरता रेसकोर्स जवळील केशवराव खाडये मार्गापासून संत गाडगे महाराज चौकापर्यंत एक नवीन पूल बांधण्याचे काम सध्या सुरु आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील डॉ. ई मोझेस रोड आणि केशवराव खाडे मार्ग यावर रेल्वे मार्गावर पूल असून सात रस्ते असलेल्या संत गाडगे महाराज चौकात हे पूल उतरते. महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पूल हा ताडदेव, हाजी अली, महालक्ष्मी मंदिर परिसर आणि वरळी व लोअर परळ विभागाला जोडला जातो. कोस्टल रोड झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन सुरळीत करण्याकरता डॉ. ई.मोझेस मार्ग आणि केशवराव खाड्ये मार्गावर रेल्वे लाईनवर पूल बांधणे गरजेचे असल्याचे त्यांनी तांत्रिक सल्लागार स्पेक्ट्म टेक्नो कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच फेरतपासणीसाठी नेमलेल्या सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानुसार निविदा मागवली होती. या निविदांमध्ये ऍप्को-सीआरएफजी या संयुक्त भागीदारातील कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला विविध करांसह एकूण ७४५ कोटी रुपयांना कंत्राट काम देण्यात येत आहे. हे पूल दक्षिण बाजुला केबल स्टेडचा वापर करत बांधण्यात येत असून हे पूल पूर्णपणे न पाडता या नवीन दोन पुलांची बांधकामे हाती घेण्यात आली आहे. तसेच दोन्ही पुलांची बांधकाम पुर्ण झाल्यानंतर जुन्या पुलाचे पाडकाम हाती घेतले जाणार आहे.

(हेही वाचा राहुल गांधीच माफीवीर, माफीनाम्यांची जंत्रीच सोशल मीडियात व्हायरल)

संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली

महालक्ष्मी रेसकोर्स ते सातरस्ता जेकब सर्कल येथील रेल्वेवरील केबल स्टेड पुलाचे काम सुरु असतानाच एन.एम. जोशी मार्ग जंक्शन ते एस ब्रीज जंक्शनपर्यंत आणि हाजी अली जवळील महालक्ष्मी रेसर्कोस वाहनतळातून एक मार्गिका बांधकाम हे सुरु असलेल्या केबल स्टेड पुलाला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिरीन टॉकीज जवळील हा पूल संत गाडगे महाराज चौक अर्थात सात रस्ता –जेकब सर्कल याठिकाणी पूर्वी संपल्यास जेकब सर्कलला मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेल्या केबल स्टेड पुलाच्या प्रत्येकी दोन मार्गिक शिरिन टॉकीजच्या अगोदर संपवून नवीन प्रस्तावित पुलाच्या प्रत्येकी दोन मार्गिका या जेकब सर्कल(सात रस्ता) मलनिस्सारण प्रचालन केंद्रावरून रेल्वेवरील पुलाचा विस्तार गंगाराम तळेकर चौक अर्थात एन.एम. जोशी मार्ग व एस.ब्रीज जंक्शनपर्यंत केल्यास सातरस्ता जंक्शनला होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच केशवराव खाड्ये मार्गावरील महालक्ष्मी रेसकोर्स जवळील ७० झाडे तोडण्यापासून वाचवण्यासाठी एक मार्गिका वर चढवून सध्या सुरु असलेल्या रेल्वेवरील केबल स्टेड पुलाला जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पुलासाठी स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रायव्हेंट लिमिटेड कंपनीने बनवलेल्या आराखड्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये पिनाकी इंजिनिअर्स अँड डेव्हलपर्स- टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड या संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या विस्तारीत पूलाचे काम पावसाळा वगळून ३० महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here