कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात (Mahalakshmi Jagadamba Temple) गुरुवारी शिंगाडा पिठाची पुरी आणि बटाटा भाजीचे सेवन केल्यावर २५ ते ३० जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या सगळ्यांना तत्काळ नंदिनी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. येथील कर्मचाऱ्यांसह इतर सुमारे २५ ते ३० जणांनी या खाद्यपदार्थांसह लाडूचेही सेवन केले. (Mahalakshmi Jagadamba Temple)
(हेही वाचा –IPL 2024 MI bt RCB : इशान, सूर्यकुमार आणि बुमराच्या धडाक्यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धुव्वा)
हे पदार्थ खाल्यानंतर (Mahalakshmi Jagadamba Temple) काही वेळातच गळ्यांना अचानक ओकारी, थंडी, भोवळचा त्रास सुरू झाला. सगळ्यांची प्रकृती खालावत असल्याचे बघत तातडीने सगळ्यांना जवळच्या नंदिनी रुग्णालयात हलवण्यात आले. आतापर्यंत सुमारे २६ रुग्ण उपचारासाठी आले असून रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Mahalakshmi Jagadamba Temple)
(हेही वाचा –Narendra Modi: पंतप्रधान मोदी शुक्रवारी राजस्थान आणि जम्मू-काश्मीर दौऱ्यावर; जाहीर सभा, रोड शोचे आयोजन)
”फराळातून अतिशय किरकोळ स्वरुपाची विषबाधा झाली. रुग्णांवर उपचार केले. सगळेच सुखरूप आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. काही कामावरही परतले आहेत.” असं मंदिराच्या व्यवस्थापकांनी सांगितलं आहे. (Mahalakshmi Jagadamba Temple)
हे पहा –
Join Our WhatsApp Community