Mahalakshmi Race Course : रॉयल वेस्टर्न क्लबच्या ‘त्या’ जागेचे वार्षिक भाडे सव्वा कोटी रुपये

321
Mahalakshmi Race Course : रॉयल वेस्टर्न क्लबच्या 'त्या' जागेचे वार्षिक भाडे सव्वा कोटी रुपये
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सची (Mahalakshmi Race Course) जागा २११ एकर जागेपैंकी १२० एकर जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरीत केल्यानंतर उर्वरीत ९१ एकर जागा ही रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला पुढील ३० वर्षांकरता भाडेकरारावर देण्यात आला आहे. मात्र, सन २०१३ रोजी या क्लबसोबतच्या कराराचे नुतनीकरण न झाल्याने सन २०२३ पर्यंतच्या कालावधीकरता भूभाड्यापोटील एकूण ६ कोटी ७५ लाख रुपये क्लबकडून वसूल केले आहे. मात्र, हे भाडे जुन्याच दराने वसूल केले असून आता जून २०२३ ते ३१ मे २०५३ या कालावधी करता नव्याने भूभाड्याने दिला आहे. या जागेच्या भाडयापोटी रॉयल वेस्टर्न क्लबल रेडीरेकनच्या किंमतीच्या १० टक्के रकमेवर १ टक्के या प्रचलित दराने म्हणजे वार्षिक सव्वा कोटी रुपये एवढे भाडेदर महापालिकेकडून आकारला जाणार आहे.

(हेही वाचा – शरद पवारसुद्धा Uddhav Thackeray ना कंटाळले आहेत; Chandrashekhar Bawankule यांचा हल्लाबोल)

महालक्ष्मी रेसकोर्स येथे महापालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalakshmi Race Course) येथील २१२ एकर एवढ्या भूखंडापैंकी १२०.१२ एकर एवढ्या क्षेत्रफळाची जागा वगळून रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना उर्वरीत ९२.६१ एकर जागा ही १ जून २०२३ ते ३१ मे २०५३ या ३० वर्षांच्या कालावधीकरता भाडेकरारावर दिली आहे. न्युयॉर्क, अमेरिका तसेच लंडन, इंग्लंड येथील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर महालक्ष्मी रेसकोर्स येथे महापालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे पब्लिक पार्क बनवण्यात येत असल्याने क्लबकडून महापालिकेला जसे आहे , तसे या तत्वावर परत घेतले गेले आहे.

(हेही वाचा – Water Cut : ‘या’ भागातील नागरिकांनी आतापासूनच पाणी वापरा जपून, कारण शुक्रवारसह शनिवारी राहणार पूर्ण कपात)

विशेष म्हणजे क्लब सोबतच्या भाडेकराराचा कालावधी सन जून २०१३मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्याच्या भाडेकराराचा अद्याप नुतनीकरण करण्यात आले नव्हते. मात्र सेट्रल पार्कसाठी १२० एकरची जागा ताब्यात घेण्यात आल्याने क्लबला ३० वर्षांचा भाडेकरार वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जून २०१३ ते मे २०२३ या कालावधीकरता भुईभाड्यापोटी ६ कोटी रुपये रुपये वसूल करण्यात आली आहे. मात्र भाडे केवळ २११ एकर जागेसाठी नसून केवळ ९२ एकर जागेसाठीच आकारले असल्याची माहिती समोर आली आहे. रेसकोर्सच्या (Mahalakshmi Race Course) संपूर्ण २११ एकर भूभागासाठी सन २०१३ ते मे २०२३ या कालावधीकरता भूभाड्याच्या फरकाची रक्कम शासनाने २६ जून २०२४ मध्ये घेतलेल्या निर्णयप्रमाणे वसूल करण्यात येणार नसल्याचेही करारात नमुद केले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रॉयल वेस्टर्न क्लब यांच्याकडून जून २०१३ पासून मे २०२३ पर्यंत जुन्याच दरानुसार भूभाडे वसूल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.